महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

खळबळजनक..! तीन सख्ख्या बहिणींनी गळफास घेऊन केली आत्महत्या, मध्य प्रदेशातील घटना - mp three girl suicide

मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात तीन बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या ( Three sister committed suicide in khandwa District ) केली आहे. त्यांचे मृतदेह फासावर लटकलेले ( Three sister committed suicide in kotaghat village ) आढळले. ही घटना मंगळवारी रात्री 3 वाजता घडली. पोलिसांना घटनास्थळी (three sisters in mp committed suicide) कुठलाही पुरावा किंवा सुसाईड नोट सापडलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

suicide
suicide

By

Published : Jul 27, 2022, 1:03 PM IST

खंडवा (म.प्र) -मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात तीन बहिणींनी गळफास ( Three sister committed suicide in khandwa District ) घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांचे मृतदेह ( Three sister committed suicide in kotaghat village ) फासावर लटकलेले आढळले. ही घटना मंगळवारी रात्री 3 वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिघींचेही मृतदेह नाल्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ( Three sisters in mp committed suicide ) रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा -सोनिया गांधी आजही 'ईडी' कार्यालयात चौकशीला हजर, काल 6 तासांहून अधिक काळ चौकशी

कौटुंबिक व परस्पर संबंधातून आत्महत्या झाल्याचा संशय - ही घटना जिल्ह्यातील जावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोटाघट गावातील आहे. जावर पोलीस ठाण्याचे प्रभारी शिवराम जाट यांनी सांगितले की, सोनू, सावित्री आणि ललिता अशी तीन बहिणींची नावे आहेत. त्यांचे वडील जमासिंग यांचे निधन झाले आहे. कुटुंबात आठ भावंडे आहेत. यातील दोन बहिणींचे लग्न झालेले नव्हते. सोनू आणि सावित्री खांडवा येथील एसएन कॉलेजमध्ये शिकतात. मोठी बहीण सावित्री काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती. कौटुंबिक व परस्पर संबंधातून ही आत्महत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मृतांजवळ नव्हती सुसाईड नोट आढळली नाही -एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. त्याचवेळी पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट किंवा पुरावा सापडलेला नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपास आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल.

हेही वाचा -Ramsar wetlands : रामसर यादीत पाणथळ प्रदेश म्हणून आणखी 5 भारतीय स्थळांचा समावेश

ABOUT THE AUTHOR

...view details