कोलकाता -मुंबईहुन कोलकात्याला जाणारी विस्तारा कपंनीच्या विमानात टर्बुलंसमुळे (Turbulence) आठ प्रवासी जखमी झाले आहेत. तर यातील तीन गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे ही घटना काल (सोमवारी) सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान जेव्हा विमान कोलकाता येथून 25 किमी दूर असताना घडली. कोलकाता विमानतळ प्रशासनाने याबाबत माहिती दिली.
चौकशी केल्यावर माहिती देण्यात येईल -
विस्तारा कंपनीचे प्रवक्ते म्हणाले, 7 जूनला मुंबई-कोलकाता दरम्यान उड्डाण करणारी प्लाइट यूके 775 ला उड्डाण करण्यापूर्वीच टर्बुलेंसचा सामना करावा लागला. यादरम्यान, काही प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले तसेच कोलकाता येथे पोहेचल्यावर त्यांना भरपाईही देण्यात आली. आम्ही प्राथमिकतेच्या आधारावर या घटनेची चौकशी करत आहोत आणि लवकरच याबाबत माहिती दिली जाईल, अशी माहिती विस्ताराच्या प्रवक्त्यांनी दिली.
हेही वाचा -इस्रोने तयार केले तीन प्रकारचे व्हेंटिलेटर; तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यासही उत्सुक
कोलकाता विमानतळाचे संचालक सी पट्टाभी यांनी सांगितले की, काल (सोमवारी) सायंकाळी चार वाजून 25 मिनिटांच्या दरम्यान यूके 775 प्लाइटने सुरक्षितरित्या कोलकाता विमानतळावर लँडिंग केले. दरम्यान, या विमानात एकूण 123 प्रवासी होते.