भुवनेश्वर ( ओडिशा ) : भुवनेश्वरमध्ये एका 15 महिन्यांच्या चिमुरडीचा तिच्या आई-वडिलांसोबत लटकलेला मृतदेह सापडला ( Maharashtrian family suicide in Bhubaneswar ) आहे. भुवनेश्वरमधील लक्ष्मीसागर येथील चिंतामनीश्वर परिसरात ही घटना घडली.
मृत दाम्पत्य महाराष्ट्रातील रहिवासी असल्याची ओळख पटली आहे. तुषार राजेंद्र जगताप, त्यांची पत्नी नीला तुषार जगताप आणि मुलगी शिवण्या अशी मृतांची नावे आहेत.
अल्पवयीन मुलीची हत्या करून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात ( Suicide by killing a minor girl ) आहे. तिघांचेही मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळले. हे तिघे महाराष्ट्रातील कुठल्या भागातले रहिवासी आहेत याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी शेजाऱ्यांनी सांगितले की, तुषार आणि नीला यांच्यात वाद सुरू ( suicide due to husband-wife dispute ) होता. कारण महाराष्ट्रात राहणाऱ्या त्याच्या वडिलांनी नुकतेच पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर एका महिलेशी लग्न केले आणि त्याची संपत्ती दुसऱ्या पत्नीला दिली होती.
हेही वाचा : BS Yediyurappa's granddaughter Suicide : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नातीची गळफास घेत आत्महत्या