महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून आणखी तीन दहशतवाद्यांना युपीमधून अटक - दिल्ली एटीएस

बुधवारी युपी एटीएसने आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. जमीन हा आरोपी रायबरेली, इम्तियाज हा प्रयागराज तर मोहम्मद ताहिर उर्फ मदनी हा उत्तर प्रदेशमधील रहिवाशी आहे. तिन्ही आरोपींना युपी युटीएसने स्पेशल सेलकडे सोपविले आहे.

दहशतवादी
दहशतवादी

By

Published : Sep 15, 2021, 5:51 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तानचे कनेक्शन असलेल्या आणखी तीन दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने बुधवारी अटक केली आहे. ही अटक युपी एटीएसच्या मदतीने उत्तर प्रदेशमधून करण्यात आली आहे.

तिन्ही आरोपींना उत्तर प्रदेशमधून दिल्लीत आणण्यात येत आहे. दहशतवाद्यांनी कोणता डाव रचला होता, याबाबत दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल चौकशी करणार आहे.

हेही वाचा-जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश

युपी एटीएसने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला केली मदत-

मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांची स्पेशल सेलने मंगळवारी राजस्थान, दिल्ली आणी युपीमधून सहा दहशतवाद्यांना अटक केली होती. या पूर्ण ऑपरेशनमध्ये युपी एटीएसची मदत घेण्यात आली आहे. बुधवारी युपी एटीएसने आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. जमीन हा आरोपी रायबरेली, इम्तियाज हा प्रयागराज तर मोहम्मद ताहिर उर्फ मदनी हा उत्तर प्रदेशमधील रहिवाशी आहे. तिन्ही आरोपींना युपी युटीएसने स्पेशल सेलकडे सोपविले आहे.

हेही वाचा-दिल्लीतील सहा संशयित दहशतवाद्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी, मुंबईतील एकाचा समावेश, महाराष्ट्रही होता निशाण्यावर

दरम्यान, अटकेतील सहा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. या आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा-SCO SUMMIT व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून पंतप्रधान होणार सहभागी; परराष्ट्रमंत्री थेट परिषदेत राहणार हजर

हिंदू नेते निशाण्यावर, महाराष्ट्रात करायचा होता स्फोट

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार यामध्ये ओसामा आणि जिशान हे दोघे गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात जाऊन दहशवादी कारवायांचे प्रशिक्षण घेऊन परतले आहे. त्यांना मस्कट मार्गे पाकिस्तानात नेले होते. या दोन्ही संशयितांकडून स्फोटके आणि विदेशी शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. या अटकक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांना भारतातील अनेक देशांमध्ये हल्ले करण्यासाठी पैसा आणि हत्यारांचा पुरवठा केला जात होता. यांच्या निशाण्यावर अनेक हिंदूत्ववादी नेते होते. दिल्ली, महाराष्ट्र, यूपीसह अन्य काही राज्यात बॉम्ब स्फोट करण्याचे यांचे नियोजन होते, अशीही माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details