नवी दिल्ली - फ्रान्सबरोबर झालेल्या कराराप्रमाणे सातव्या टप्प्यात राफेलची तीन लढाऊ विमाने भारतात दाखल झाली आहेत. या राफेल विमानांनी फ्रान्सहून सलग ८ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत भारतात प्रवेश केला आहे. देशाला आणखी तीन राफेल मिळणार असल्याने भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात आणखी वाढ होणार आहे.
भारतीय हवाई दलाने तीन राफेल देशात दाखल झाल्याची माहिती ट्विट करून दिली आहे. हवाई दलाने ट्विटमध्ये म्हटले, की भारतात राफेल दाखल झाली आहेत. संयुक्त अरब अमिरातीच्या हवाई दलाने इंधन भरण्यासाठी मदत केल्याने त्यांचे आभार.
हेही वाचा-माळीण फाटा येथे 15 कोटी खर्चूनही खचला रस्ता! बारा गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता
सप्टेंबर २०१६ मध्ये राफेल खरेदीचा सुमारे ५८ हजार कोटींचा करार
देशाकडे एकूण २४ राफेल झाली आहेत. नवीन राफेल हे पश्चिम बंगालमधील हसिमारा येथील हवाई दलाच्या वायुतळावर तैनात होणार आहे. पहिल्या राफेल स्क्वाड्रनचा ताफा हा अंबाला एअर फोर्स स्टेशनमध्ये आहेत. एका स्क्वाड्रनमध्ये १८ लढाऊ विमाने असतात. भारताने फ्रान्सबरोबर सप्टेंबर २०१६ मध्ये राफेल खरेदीचा सुमारे ५८ हजार कोटींचा करार केला आहे. यापूर्वी २९ जुलैला देशाला पहिल्या टप्प्यात ५ राफेलची लढाऊ विमाने मिळाली आहेत.
हेही वाचा-जुन्या कसारा घाटात पुन्हा कोसळली दरड; उंबरमाळी स्थानकात ३ फूट पाणी
आणखी राफेलची लढाऊ विमाने मिळणार
येत्या काही महिन्यांत भारताला आणखी राफेलची लढाऊ विमाने मिळणार आहेत. फ्रान्सच्या डस्साल्ड एव्हिशन कंपनीने राफेलची निर्मिती केली आहे. भारताने २३ वर्षापूर्वी रशियाकडून सुखोई ही लढाऊ विमाने खरेदी केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच भारताने लढाऊ विमाने आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. राफेलमध्ये शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे.
हेही वाचा-जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार; राज्य सरकारचे एसीबीमार्फत चौकशीचे आदेश
असा आहे खरेदीचा व्यवहार
सप्टेंबर २०१६ मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ क्षमतांना बळकट करण्यासाठी भारताने फ्रान्सबरोबर ३६ राफेल विमाने ५९,००० कोटींना खरेदी करण्याचा करार केला. भारतीय हवाई दलाने दोन्ही तळावर शेल्टर्स, हँगर्स आणि देखभाल सुविधांच्या विकासासाठी ४०० कोटी रुपये खर्च केले आहेत. राफेल लढाऊ विमानाची पहिली तुकडी ही अंबाला हवाई दल तळावर तैनात करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाचा तळ हा भारत-पाकिस्तान सीमेरेषेपासून २०० किमी अंतरावर आहे. राफेलची दुसरी तुकडी पश्चिम बंगालमध्ये हसिमारा इथे असेल. सर्व ३६ विमानांची डिलिवरी एप्रिल २०२२ पर्यंत मिळण्याची शक्यता आहे.