जम्मू -जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन अतिरेक्यांना घेरले आहे ( Three LeT militants Trapped In Budgam ). पकडले जाण्याच्या भीतीने अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार सुरू केला, तर जवानांनीही त्यांना जोरदार प्रत्यूत्तर ( Budgam Encounter ) दिले आहे. अतिरिक्त सुरक्षा दलही या ठिकाणी तातडीने पाठविण्यात आले आहे. अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अतिरेकी घातपात करण्याचे अलर्ट मिळाले असून देशभरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. ( Security Arrangements Were Increased )
जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, राहुल भट आणि अमरीन भट यांच्यासह अनेक नागरिकांच्या हत्येमध्ये सहभागी असलेला दहशतवादी लतीफ रादरही अडकला आहे. "सध्या सुरू असलेल्या चकमकीत लतीफ रादरसह एलईटी (टीआरएफ) चे 03 अतिरेकी अडकले आहेत. राहुल भट आणि अमरीन भट यांच्यासह अनेक नागरिकांच्या हत्येमध्ये लतीफचा सहभाग आहे," काश्मीर झोन पोलिसांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP) काश्मीरच्या हवाल्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.