अमरावती :आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात झालेल्या एका अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर नऊ जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्याच्या वडलामन्नडू गावामध्ये रिक्षाने अज्ञात वाहनाला टक्कर दिल्यामुळे ही दुर्घटना घडली. ही धडक इतकी जोरदार होती, की यात रिक्षाचा चक्काचूर झाला.
पोलीस उपनिरिक्षक टी. श्रीनिवास यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंजेरू गावातील काही कामगार रिक्षामधून वडलामन्नडू गावाकडे निघाले होते. एका रिक्षामध्ये हे सर्व मजूर जात होते. गावाजवळ पोहोचताच रिक्षा चालकाने एका लॉरीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यात समोरुन येणाऱ्या एका वाहनाची रिक्षाला जोरदार धडक बसली.