महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शेतकरी आंदोलन : टिकरी सीमेवर शेतकऱ्यांचा मृत्यू - शेतकरी आंदोलन अपडेट

टिकरी सीमेवर शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दोघांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. तर तीसऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू कशाने झाला हे अद्याप समोर आलेले नाही.

शेतकरी आंदोलन
शेतकरी आंदोलन

By

Published : Jan 25, 2021, 12:49 PM IST

झज्जर -26 जानेवारी रोजी प्रस्तावित ट्रॅक्टर परेडमध्ये भाग घेण्यासाठी आलेल्या दोन शेतकऱ्यांचा टिकरी बॉर्डरवर मृत्यू झाला. दोघांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. तसेच सेक्टर 9 मध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी सकाळी दोन्ही शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. हिसारमधील मंडी आदमपूर येथे राहणारे 47 वर्षीय जयबीर आणि पंजाबच्या मानसामधील धिंगार गावात राहणारे 48 वर्षीय गुरमीत आज सकाळी मृत अवस्थेत आढळले. रविवारीच दोघेही परेडमध्ये सहभागी होण्यासाठी आले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. छाती दुखल्याने दोघांचा अचानक मृत्यू झाला. टिकरी सीमेजवळील सेक्टर 9 मध्ये सकाळी एक शेतकरी मृतावस्थेत आढळला. संबधित शेतकऱ्याची ओळख पटली असून मिरचपूर गावातील जोगिंदर आहेत.

टिकरी सीमेवर 25 शेतकऱ्याचा मृत्यू -

तिघांच्या मृत्यूनंतर, टिकर सीमेवरील शेतकर्‍यांच्या मृत्यूची संख्या आता 25 वर पोहोचली आहे. रविवारीपर्यंत 22 शेतकर्‍यांचा मृत्यू झाला होता. यातील बहुतेक शेतकरी हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले आहेत. गेल्या काही दिवसांत 10 शेतकरी मरण पावले आहेत. संबधित माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सिव्हिल रुग्णालयात पाठविले. या दोन्ही मृतदेहांचे पोस्टमार्टम दुपारी करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details