गाझियाबाद (उत्तर प्रदेश) -विजयनगर बायपासजवळ ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक अचानक गर्दीत गेला. यामुळे झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त ट्रक बाजूला केले आहे. नागरिकांच्या मदतीने ट्रक चालकाला पकडण्यास पोलिसांना यश आला आहे.
ट्रकचे ब्रेक झाले होते निकामी
प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, ट्रक राष्ट्रीय महामार्ग 24 वरून येत होता. त्यावेळी अचानक ट्रकचे ब्रेक निकामी झाले. यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक पदपथावर गेला.