महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

धक्कादायक : कानपूरमध्ये ट्रिपल मर्डर! दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह - Murder of three members of family in kanpur

कानपूर शहरातील फजलगंज येथे प्रेम किशोर यांचे किराणा दुकान आहे. त्यांची पत्नी गीता आणि मुलगा नैतिक यांच्यासह ते या परिसरात राहतात. या तिघांचीही हत्या करण्यात आली आहे आणि त्यांचे मृतदेह हे घरात एका दोरीच्या साह्याने बांधलेल्या अवस्थेत आढळले आहेत.

three-dead-body-found-in-a-house-in-fazalganj-police-station-area-of-kanpur
धक्कादायक : कानपूरमध्ये ट्रिपल मर्डर! दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

By

Published : Oct 2, 2021, 3:37 PM IST

Updated : Oct 2, 2021, 5:03 PM IST

कानपूर (उत्तरप्रदेश) - शहरातील फजलगंज भागात ट्रिपल मर्डर झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका घरामध्ये तीन मृतदेह आढळून आले आहेत. हैराण करणारी गोष्टी अशी आहे की, या तिन्ही मृतदेहांना दोरीच्या साह्याने एकत्र बांधून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी हा प्रकार चोरीचा असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलीस अधिकारी हे प्रत्येक गोष्टीचा बारकाईने तपास करत आहेत, अशी माहिती डीसीपी संजीव त्यागी यांनी दिली आहे.

धक्कादायक : कानपूरमध्ये ट्रिपल मर्डर! दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळले मृतदेह

घरात आढळले तीन मृतदेह -

फजलगंज येथे प्रेम किशोर यांचे किराणा दुकान आहे. त्यांची पत्नी गीता आणि मुलगा नैतिक यांच्यासह ते या परिसरात राहतात. या तिघांचीही हत्या करण्यात आली आहे आणि त्यांचे मृतदेह हे घरात एका दोरीच्या साह्याने बांधलेल्या अवस्थेत आढळले आहेत. अद्याप हे निष्पन्न झाले की त्यांची हत्या कशी झाली आहे. पोलीस हे घटनास्थळावर तपास करत आहेत. तर फॉरेंसिक टीम देखील घटना स्थळावर पोहोचली आहे. पोलिसांनी हा प्रकार चोरीचा असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शेजाऱ्यांशी या घटनेसंदर्भात पोलीस हे विचारपूस करत आहेत. घटनास्थळावर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी भेट दिली असून घटनेची पाहणी केली आहे.

कानपूर 24 तासांत पाच हत्या -

कानपूर शहरात 24 तासांत पाच हत्या झाला आहेत, यामुळे शहरात भीतीचे वातावरण असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. गुरूवारी सचेंडी परिसरात एका युवकाची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. तर शुक्रवारी बर्रा परिसरात सपा नेत्याची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. आणि आज पुन्हा 3 हत्या शहरात झाल्याने कानपूरकरांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे. या हत्या प्रकरणात आतापर्यंत एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलिसांची धरपकड ही सुरूच आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हे फजलगंज पोलीस करत आहेत.

हेही वाचा -उत्तरप्रदेशात फटाख्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, तीन जणांचा मृत्यू

Last Updated : Oct 2, 2021, 5:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details