हावडा ( पश्चिम बंगाल ) : Children Died: पश्चिम बंगालमधील उलुबेरियामध्ये गुरुवारी रात्री वेगवान लोकल ट्रेनने धडक दिल्याने तीन मुलांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत असे सांगण्यात येत आहे की, तिन्ही मुले स्टेशनपासून दूर रेल्वे ट्रॅकवर खेळत होती, त्यादरम्यान वेगात येणाऱ्या लोकल ट्रेनने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. ULUBERIA IN HOWRAH DISTRICT OF WEST BENGAL
Children Died: पश्चिम बंगाल : उलुबेरिया येथे रेल्वे धडकल्याने तीन मुलांचा मृत्यू - Three children playing on the tracks died
Children Died: पश्चिम बंगालमधील उलुबेरिया येथे लोकल ट्रेनच्या धडकेत तीन मुलांचा मृत्यू झाला. अपघात झाला त्यावेळी मुले रेल्वे रुळावर खेळत होती. Uluberia of Howrah District of West Bengal
![Children Died: पश्चिम बंगाल : उलुबेरिया येथे रेल्वे धडकल्याने तीन मुलांचा मृत्यू Three children playing on the tracks died after being hit by a train in Uluberia of Howrah District of West Bengal](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16582502-thumbnail-3x2-train.jpg)
उलुबेरिया स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या डोम पाडा भागात ही घटना घडली. अपघातात ठार झालेल्या मुलांचे वय 10 ते 12 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच उलबेरिया पोलिस स्टेशनसह आरपीएफ आणि जीआरपीची टीम घटनास्थळी पोहोचली.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताबाबत दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) आदित्य कुमार चौधरी म्हणाले की, उल्बेरिया स्थानकाजवळ एक घटना घडली आहे जी अत्यंत दुःखद आहे. या घटनेची चौकशी केली जाईल.