CRPF: माओवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे तीन जवान शहीद - नुआपाडा जिल्ह्यातील तीन जवान शहीद
नुआपाडा जिल्ह्यातील भैसदानी येथे मंगळवारी झालेल्या माओवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ( CRPF ) तीन जवान शहीद झाले. हे जवान रोड ओपनिंग पार्टीचा भाग असताना अचानक गोळीबार झाला. त्यामध्ये ते शहीद झाले. एएसआय शिशुपाल सिंग (उत्तर प्रदेश), एएसआय शिवलाल आणि कॉन्स्टेबल धर्मेंद्र सिंग अशी मृत जवानांची नावे आहेत.
फाईल फोटो
भुवनेश्वर (ओडिशा) -नुआपाडा जिल्ह्यातील भैसदानी येथे मंगळवारी झालेल्या माओवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ( CRPF ) तीन जवान शहीद झाले. हे जवान रोड ओपनिंग पार्टीचा भाग असताना अचानक गोळीबार झाला. त्यामध्ये ते शहीद झाले. एएसआय शिशुपाल सिंग (उत्तर प्रदेश), एएसआय शिवलाल आणि कॉन्स्टेबल धर्मेंद्र सिंग अशी मृत जवानांची नावे आहेत.