महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू; २ लाख ५ हजार रुपयांचे नुकसान - lightning strike

सोमवारी झालेल्या विजांचा कडकडाट आणि वादळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच गोंधळवाडी, लकडेवाडी, जाडरबोबलाद येथे वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन शेतकऱ्याचे २ लाख ५ हजार रुपयांचे नुकसान झाले.

जनावरांचा मृत्यू
जनावरांचा मृत्यू

By

Published : Apr 27, 2021, 8:20 PM IST

सांगली - जत तालुक्यातील गोंधळवाडी, लकडेवाडी, जाडरबोबलाद येथे वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू झाला. यामध्ये तीन शेतकऱ्याचे २ लाख ५ हजार रुपयांचे नुकसान झाले. सोमवारी झालेल्या विजांचा कडकडाट आणि वादळी पावसामुळे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गोंधळेवाडी येथील शेतकरी निल्लव्वा मायप्पा पांढरे यांंच्या म्हैसीवर वीज पडून मृत्यू झाला. त्यात ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. जाडरबोबलाद येथील शेतकरी परशुराम शिवप्पा ऐनापुरे यांच्या गाईचा मृत्यू झाला. शिवाप्पा याचेे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले. लकडेवाडी येथील शिवाजी सुखदेव लकडे यांच्या देखील गाईचा मृत्यू झाल्याने 65 हजार रुपयांचे नुकसान झाले. गोंधळेवाडी, जाडरबोबलाद, लकडेवाडी येथे प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामा केला. जाडरबोबलादचे तलाठी विनायक बालटे, लकडेवाडीचे नितीन कुंभार, राजेश चाचे, गणेश पवार, राहूल कोळी यांनी पंचनामा केला.

ABOUT THE AUTHOR

...view details