कोझिकोड (केरळ):100 percent Hinde Leteracy: केरळच्या एका छोट्याशा गावात सेप्टुएजेनेरियन जानकी अम्मा या हिंदी शिकत आहेत. गावातील अनेकांनी हिंदी शिकण्याचा प्रयत्न सुरु केला असून, आता जानकी अम्मा या हिंदी वाक्य बोलून वाक्याची पुनरावृत्ती करत आहेत. तामिळनाडूसह केरळ राज्यात 'हिंदी लादण्याच्या' कोणत्याही प्रयत्नांना विरोध होत असताना जानकी अम्मा "एक थंडी अंधेरी रात सडक पे जा" हे वाक्य त्यांच्या प्रशिक्षकाकडून शिकत असून, हिंदी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. Kerala village 100 per cent literacy in Hindi
पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनापर्यंत चेलान्नूर गावाला संपूर्ण हिंदी साक्षर पंचायत घोषित करण्याचे उद्दिष्ट गावाने ठेवले आहे. केरळमधील अशा प्रकारची पहिली नागरी संस्था आणि कदाचित दक्षिण भारतातील पहिली पंचायत घोषित करण्याचा गावाचा प्रयत्न असल्याचे येथील काँग्रेसशासित चेल्लानूर ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्रामपंचायतीमधील मनुष्यबळाचा वापर करून मर्यादित निधीसह अनोखा प्रकल्प राबविणे हे अधिकाऱ्यांचे प्राधान्य आहे.