नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर असून आहे. सध्या कोरोना रुग्णांच्या वाढीत थोडी घट झाल्याचे पाहायला मिळत असून दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. मात्र, यातच आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे लसीकरणावर भर, नियम, निर्बंध पाळण्याच्या सूचना केंद्राने राज्य सरकारांना दिल्या आहेत. केंद्र सरकारने राज्यांना सतर्क राहण्याचे सांगितले आहे.
कोरोना महामारीत तिसरी, चौथी, पाचवी म्हणजे कितीही लाटा येऊ शकतात. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण लाटेचा सामना करण्यास किती तयार आहोत? लसीकरणाचा वेग वाढविला गेला आहे. जेणेकरून तिसरी लाट येण्यापूर्वी अधिकाधिक लोकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सर्व तयारी करण्यात येत आहे. पण तीसरी लाट कधी येईल याबद्दल त्यांनी नेमकी वेळ माहिती नाही.
कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही हे आपल्या हातात आहे. आम्ही तिसऱ्या लाटेसाठी पूर्णपणे तयार आहोत. ते जर आपण शिस्तीत राहिलो आणि कोविड प्रोटोकॉलचे अनुसरण केले. तर तिसरी लाट येणार नाही, असे नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. विनोद पॉल यांनी सांगितले.