अमृतसर :अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरात तिसरा स्फोट झाल्याने नागरिक चांगलेच हादरले आहेत. हा स्फोट गुरु रामदास सराजवळ रात्री एक वाजता घडला असून याप्रकरणी पंजाब पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतले आहे. या स्फोटामुळे घाबरलेल्या नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. या घटनास्थळावर पोलिसांना एक चिठ्ठी मिळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गोल्डन टेम्पल परिसरात झाला स्फोट :अमृतसर येथील सुवर्ण मंदिर परिसरातील गुरु रामदास सराच्या जवळ हा स्फोट संशयितांनी घडवून आणला आहे. स्फोटानंतर घाबरलेल्या नागरिकांनी तात्काळ याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. गुरु रामदास सरामध्ये थांबलेल्या भाविकांनी घाबरुन बाहेर धाव घेतली. यावेळी शिरोमणी समितीचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांना आढळली चिठ्ठी :सुवर्ण मंदिर परिसरात तिसऱ्यांदा स्फोट झाल्याने अमृतसर चांगलेच हादरले आहे. गुरु रामदास सराच्या जवळ झालेल्या या घटनेने अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराला भेट देण्यासाठी आलेले भाविक चांगलेच हादरले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नौनिहाल सिंग यांनीही स्फोटाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी घटनास्थळावर मोठा फौजफाटा दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी पोलिसांना घटनास्थळावरुन एक चिठ्ठी मिळून आली आहे. त्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी पकडले संशयित आरोपी :सुवर्ण मंदिर परिसरात झालेल्या स्फोटाच्या ठिकाणी पोलिसांना एक चिठ्ठी आढळून आली आहे. या चिठ्ठीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यानुसार पोलिसांनी पाच संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या संशयितांची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या स्फोटाचा पुढील तपास करत आहेत.