दरभंगा -बिहारमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असून मतदारांचा उत्साह शिखरावर आहे. सकाळपासूनच लोक मतदानाचा हक्क बजावत आहेत. हयाघाट विधानसभा मतदारसंघातील सिर्निया पंचायतीच्या घारी टोला येथील लोकांनी परस्पर सहकार्याने बागमती नदीवर लाकडाचा पूल बांधला आहे. जेणेकरून मतदारांना मतदान केंद्रात पोहोचण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
एक मजबूत सरकार निवडण्यात आपली भूमिका निभाण्यासाठी गावातील लोकांनी पूल बांधला. स्वातंत्र्यानंतर कोणत्याही लोकप्रतिनिधीने या भागाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. ज्यामुळे आपल्याला बर्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मतदान केंद्र बागमती नदीच्या दुसर्या बाजूला आहे. त्यामुळे हा पूल परस्पर सहकार्याने आम्ही बांधला आहे. जेणेकरून लोक मतदानाचा हक्क बजावतील आणि सशक्त लोकशाही प्रस्थापित होईल, असे स्थानिक रहिवासी परवेझ म्हणाले.