कुरुणेगाला (श्रीलंका) - श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्र राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत हिंसाचार उसळला आहे. श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंद्र राजपक्षे यांच्या वडिलोपार्जित घराला दंगलखोरांनी आग लावली आहे. ( Rioters set fire House PM Mahindra Rajapaksa ) याशिवाय सत्ताधारी पक्षाच्या अनेक खासदारांची घरे जाळण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कुरुणेगाला शहरात असलेल्या महिंद्र राजपक्षे यांचे वडिलोपार्जित घर सोमवारी संध्याकाळी निदर्शकांनी पेटवून दिले. दरम्यान, देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी देशभर संचारबंदी लागू केली असली तरी हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही.
दरम्यान, श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू अर्जुन रणतुंगा याने देशातील जाळपोळीसाठी श्रीलंका पोदुजाना पेरामुना (SLPP)ला जबाबदार धरले आहे. ( Shrilanka PM Mahindra Rajapaksa ) रणतुंगा म्हणाले की, श्रीलंकेच्या पोदुजाना पेरामुना यांनी माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या अधिकृत निवासस्थानी लोकांना एकत्र केले. दंगलखोर श्रीलंकेच्या पोदुजाना पेरामुना यांनी खासदारांच्या घराबाहेर जमवले होते, असेही रणतुंगा म्हणाले. विशेष म्हणजे दुपारपासून संध्याकाळपर्यंत श्रीलंकेतील सत्ताधारी पक्षाच्या अनेक खासदारांच्या घराला आग लागली आहे.