महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Mobile Tower Stolen In Bihar : चोरट्यांनी चोरला चक्क मोबाईल टॉवर! कंपनीचे कर्मचारी भासवून केली चोरी - बिहारमध्ये मोबाईल टॉवर चोरला

बिहारची राजधानी पटना येथे मोबाईल टॉवरच्या चोरीचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मोबाईल टॉवरची एकूण किंमत 8 लाख 32 हजार रुपये होती.

Mobile Tower
मोबाईल टॉवर

By

Published : Jan 19, 2023, 12:27 PM IST

पाटणा : बिहारमध्ये कशाचीही चोरी शक्य आहे. लोखंडी पुलाची चोरी असो किंवा रेल्वे इंजिनची चोरी असो. आता बिहारमध्ये अशी चोरी झाली आहे, जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. बिहारची राजधानी पाटणामध्ये चक्क मोबाईल टॉवरची चोरी झाली आहे ! पाटणा येथील पीरबहोर पोलीस स्टेशन हद्दीतील एका घरात लावलेल्या मोबाईल टॉवरवर चोरट्यांनी हात साफ केला. घरमालकाला संशय आल्याने त्यांनी मोबाईल टॉवर कंपनी जीटीएलला याची माहिती दिली. त्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकाने पीर भोर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

2006 मध्ये लावला होता टॉवर :हा मोबाईल टॉवर 2006 मध्ये बसवण्यात आला होता. हा टॉवर आधी एअरसेल कंपनीचा होता पण नंतर तो GTL कंपनीने विकत घेतला होता. लिखित एफआयआरमध्ये जीटीएल कंपनीने सांगितले आहे की, जीटीएल कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून काही लोक मोबाइल टॉवर लावलेल्या घरात आले होते. त्यानंतर घराच्या छतावर जाऊन 4 तासात मोबाईल टॉवर उघडून तेथून निघून गेला.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी :याप्रकरणीगुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. जीटीएल कंपनीचे व्यवस्थापक मोहम्मद शाहनवाज अन्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल टॉवरची एकूण किंमत 8 लाख 32 हजार रुपये होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात लेखी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मॅनेजरने असेही सांगितले की, यापूर्वी कंपनी या प्रकरणाची आपल्या स्तरावर चौकशी करत होती. त्याला 4 महिने लागले आणि आता 4 महिन्यांनंतर पोलिसांना मोबाईल टॉवर चोरीची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पटनामधील मोबाईल टॉवर चोरीची ही दुसरी घटना आहे.

कंपनीचे व्यवस्थापक काय म्हणाले? : याप्रकरणी मोबाईल कंपनीचे व्यवस्थापक मोहम्मद शाहनवाज अन्वर म्हणाले की, '4 महिन्यांपूर्वी चोरी झाली होती. मोबाईल टॉवरची एकूण किंमत 8 लाख 32 हजार रुपये होती. या संपूर्ण प्रकरणाची कंपनी आधी आपल्या स्तरावर चौकशी करत होती. चोरट्यांबाबत काहीही निष्पन्न झाले नाही, तेव्हा आता पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.'

हेही वाचा :Surat Crime : हत्या करून खांद्यावर मृतदेह नेला दवाखान्यात ; पाहा सीसीटीव्ही फुटेज

ABOUT THE AUTHOR

...view details