नवी दिल्ली Thieves stole jewelry :दिल्लीतील हजरत निजामुद्दीन पोलीस स्टेशन हद्दीतील जंगपुरा भागात एका दागिन्यांच्या शोरूममध्ये चोरीची मोठी घटना घडली आहे. उमराव ज्वेलर्स येथे कोट्यवधींची चोरी झाली आहे. 20-25 कोटी रुपयांची चोरी झाल्याचं सांगण्यात येत आहे. चोरट्यांनी दुकानात ठेवलेले दागिने लंपास केले आहेत. या घटनेनंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शोरूममध्ये लावलेल्या आजूबाजूच्या सीसीटीव्हीची छाननी केली जात आहे.
20 ते 25 कोटी रुपयांचे दागिने लंपास : या संदर्भात सूत्रांचं म्हणणं आहे की, चोरट्यांनी सुमारे 20 ते 25 कोटी रुपयांचे दागिने पळवून नेले आहेत. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी याबाबत काहीही माहिती दिलेली नाहीये. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आज सकाळी शोरूम उघडलं असता शोरूम मालकाला संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली. उमराव ज्वेलर्स यांच्या घराचं छत तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून संपूर्ण दागिन्यावर हात साफ केला.
पोलीस घटनास्थळी दाखल : माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याचं पोलीस पथक, पीसीआर पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर गुन्हे पथक, फॉरेन्सिक टीमला तपासासाठी घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. पोलिसांचं पथक बाहेर लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. याशिवाय तांत्रिक मदत घेतली जात आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जिल्ह्याच्या ऑपरेशन सेलची टीमही तैनात करण्यात आली आहे.