बेगुसराय (बिहार) : बिहारमध्ये चोरीचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. बरौनीमध्ये ट्रेनचे इंजिन चोरीला गेले आहे. (Thieves steal train engine in Barauni). विशेष म्हणजे चोरट्यांनी इंजिन चोरण्यासाठी चक्क बोगदा खोदला आहे! या प्रकरणात चोरलेले 13 बोरा रेल्वे इंजिनचे भाग जप्त करण्यात आले आहेत. याची किंमत अंदाजे 30 लाखांहून अधिक आहे. (train engine stolen in bihar)
चोरीचे धागे रद्दी दुकानाशी संबंधित : हे खळबळजनक प्रकरण देखील अतिशय नाट्यमय पद्धतीने उघड झाले. मुझफ्फरपूरमध्ये 18 नोव्हेंबर रोजी रेल्वे पोलिस आणि विभागीय दक्षताच्या पथकाने एका रद्दीच्या दुकानावर छापा टाकला. यावेळी छापा टाकणाऱ्या पथकाला चोरीच्या रेल्वे इंजिनचे काही भाग सापडले. यावेळी तीन चोरट्यांनाही पकडण्यात आले. चौकशी केली असता चोरट्यांनी सर्व गुपिते उघड केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण :18 नोव्हेंबर रोजी रेल्वे पोलिस आणि रेल्वेच्या विशेष दक्षता पथकाने मुझफ्फरपूरमध्ये छापा टाकला होता. यामध्ये रेल्वे इंजिनमधून चोरलेले लाखो रुपये किमतीचे तांबे आणि अॅल्युमिनियमचे भंगार जप्त करण्यात आले. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोबरशाही परिसरात असलेल्या साहू भांडीच्या दुकानावर पथकाने छापा टाकला. छाप्यात मुझफ्फरपूर आरपीएफ व्यतिरिक्त गरहारा आणि सोनपूर आरपीएफची टीम तैनात करण्यात आली होती. यावेळी तीन चोरट्यांना अटक करण्यात आली.