वायनाड (केरळ) -चोराला उपरती झाल्याची घटना केरळमध्ये नुकतीच चर्चेचा विषय ठरत आहे. चोरांचे मानसिक परिवर्तन होणे ही नेहमीच चर्चा करण्यासारखी गोष्ट असते. वायनाडच्या पुलपल्लीतील एका चोरट्याने एका व्यक्तीचे 700 रुपये चोरले होते. आता अनेक वर्षानंतर त्या व्यक्तीला माफीनामा लिहून त्याने 2000 रुपये परत केले आहेत. त्या व्यक्तीच्या पत्नीला माफीनामा पत्र आणि पैसे मिळाले. या पत्रात चोराने माफी मागितली आहे, तसेच क्षमा करावी अशी विनंती केली होती.
मात्र हे पत्र कुणी लिहिले आहे हे कळू शकले नाही. या पत्रात लिहिले आहे की, प्रिय मेरी, अनेक वर्षांपूर्वी मी जोसेफ यांच्याकडून 700 रुपये किमतीचे साहित्य चोरले होते. आता साहित्याची किंमत सुमारे 2,000 रुपये असेल. मी ती रक्कम या पत्रासह पाठवत आहे. कृपया हे पैसे घ्या आणि मला क्षमा करा.