महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'टॉमी'ला 'कुत्रा' म्हणणं पडलं महागात; दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी.. व्हिडिओ व्हायरल

या कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या शेजारच्या व्यक्तीने सांगितले, की तुम्ही तुमच्या पाळीव कुत्र्याला बांधून ठेवत जा. कारण, हा कुत्रा खूप जास्त भुंकतो आणि कोणालाही चावू शकतो. यावरुन त्या कुत्र्याच्या मालकाला भलताच राग आला. केवळ आपल्या कुत्र्याला बांधायला सांगितले म्हणून नव्हे, तर आपल्या 'टॉमी'ला शेजाऱ्याने 'कुत्रा' म्हटले म्हणून या मालकाने शेजाऱ्याच्या कुटुंबीयांवर हल्ला केला.

Jyoti Park Colony Gurugram
'टॉमी'ला 'कुत्रा' म्हणणं पडलं महागात; दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी.. व्हिडिओ व्हायरल

By

Published : May 11, 2021, 10:19 AM IST

चंदिगढ :हरियाणाच्या गुरुग्राममधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. ज्योती पार्कमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने क्षुल्लक कारणावरुन आपल्या शेजारच्या कुटुंबावर हल्ला केला. या दोन्ही कुटुंबांच्या हाणामारीमध्ये चार ते पाच जण जखमी झाल्याचे समोर आले आहे.

'टॉमी'ला 'कुत्रा' म्हटल्यामुळे हाणामारी..

या कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या शेजारच्या व्यक्तीने सांगितले, की तुम्ही तुमच्या पाळीव कुत्र्याला बांधून ठेवत जा. कारण, हा कुत्रा खूप जास्त भुंकतो आणि कोणालाही चावू शकतो. यावरुन त्या कुत्र्याच्या मालकाला भलताच राग आला. केवळ आपल्या कुत्र्याला बांधायला सांगितले म्हणून नव्हे, तर आपल्या 'टॉमी'ला शेजाऱ्याने 'कुत्रा' म्हटले म्हणून या मालकाने शेजाऱ्याच्या कुटुंबीयांवर हल्ला केला.

'टॉमी'ला 'कुत्रा' म्हणणं पडलं महागात; मालकाने शेजारच्या कुटुंबाला दिला बेदम चोप

विशेष म्हणजे टॉमीच्या मालकाच्या कुटुंबातील सर्वांनीच या शेजारच्या कुटुंबावर हल्ला केला. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही कुटुंबांची चौकशी करुन, दोषींवर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्यविधीला शेकडोंची गर्दी; कोविडच्या नियमांचे उल्लंघन

ABOUT THE AUTHOR

...view details