महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जातींसंदर्भात माहिती जाहीर करण्याचा प्रस्ताव नाही, सरकारची लोकसभेत माहिती - जातींचा डेटा

देशातील जातींसंदर्भातील माहिती जाहीर करण्याचा कसलाही विचार नसल्याचे केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत सांगितले. दरम्यान, यापूर्वी 20 जुलै रोजीही केंद्राने लोकसभेत माहिती देताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींशिवाय इतर कोणत्याही जातींसाठी जातीनिहाय जनगणना न करण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतल्याचे सांगितले होते.

जातींसंदर्भात माहिती जाहीर करण्याचा प्रस्ताव नाही, सरकारची लोकसभेत माहिती
जातींसंदर्भात माहिती जाहीर करण्याचा प्रस्ताव नाही, सरकारची लोकसभेत माहिती

By

Published : Aug 10, 2021, 1:39 PM IST

Updated : Aug 10, 2021, 1:56 PM IST

नवी दिल्ली : देशातील जातींसंदर्भातील माहिती जाहीर करण्याचा कसलाही विचार नसल्याचे केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत सांगितले. दरम्यान, यापूर्वी 20 जुलै रोजीही केंद्राने लोकसभेत माहिती देताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींशिवाय इतर कोणत्याही जातींसाठी जातीनिहाय जनगणना न करण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतल्याचे सांगितले होते.

लोकसभेत दिली माहिती

केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लिखीत उत्तरात माहिती देताना सांगितले की, या वेळी तरी जातींसंदर्भात माहिती जाहीर करण्याचा कसलाही प्रस्ताव नाही. 2021 च्या जनगणनेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

20 जुलै रोजीही दिली होती माहिती

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींशिवाय इतर कोणत्याही जातींसाठी जातनिहाय जनगणना न करण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतल्याची माहिती मंगळवारी सरकारच्या वतीने लोकसभेत देण्यात आली. त्यामुळे आता राज्याला केंद्राकडून ओबीसींचा इम्पेरिकल डेटा मिळण्याचा मार्ग जवळपास बंद झाल्याचेच यावरून दिसत आहे. आता यावर राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एससी, एसटींच्याच गणनेची घटनेत तरतूत

केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी याविषयी लोकसभेत माहिती दिली. घटनेतील तरतुदीनुसार लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी लोकसंख्येनुसार जागा राखीव आहेत. त्यामुळे घटनेनुसार अधिसूचित असलेल्या अनुसूचित जाती आणि जमातींचीच जनगणनेत गणना केली जाते असे राय म्हणाले.

महाराष्ट्र, ओडिशाने मागितला होता जातीनिहाय डेटा

महाराष्ट्र आणि ओडिशा सरकारने अलिकडेच केंद्राकडे जातींची माहिती गोळा करण्याची मागणी केली आहे. मात्र अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींशिवाय इतर जातींची जातनिहाय जनगणना न करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याचे राय आणि एका प्रश्नाला उत्तर देताना लोकसभेत सांगितले. 2021 मध्ये जनगणना करण्यासाठी सरकारने 28 मार्च 2019 रोजी अधिसूचित केले होते. मात्र नंतर कोरोना संकट सुरू झाल्याने जनगणनेचे काम प्रलंबित असल्याचे राय आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

राज्याला ओबीसींचा इम्पेरिकल डेटा मिळणार नाही?

जातनिहाय जनगणना केली जाणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केल्याने याचा परिणाम राज्याने केंद्राकडे मागितलेल्या ओबीसींच्या इम्पेरिकल डेटाच्या मुद्द्यावर होणार आहे. जातनिहाय जनगणना न करण्याच्या केंद्राच्या निर्णयामुळे राज्याला केंद्राकडून ओबीसींचा इम्पेरिकल डेटा मिळणे जवळपास अशक्यच असल्याचे यावरून तरी दिसत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा -राज्याला केंद्राकडून नाही मिळणार ओबीसींचा इम्पेरिकल डेटा? लोकसभेतील केंद्राच्या उत्तरामुळे झाले स्पष्ट!

Last Updated : Aug 10, 2021, 1:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details