तिरुवनंतपुरम- कौटुंबिक हिंसाचारातील पीडितेला तुच्छतेने बोलणे केरळ महिला आयोगाच्या अध्यक्षांना महागात पडले आहे. केरळ महिला आयोगाच्या अध्यक्षा एम. सी. जोसेफाईन यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
टेलिव्हिजनवरील एका कार्यक्रमात कौटुंबिक हिंसाचारीतील पीडितेने केरळ महिला आयोगाच्या अध्यक्षा एम. सी. जोसेफाईन अन्याय झाल्याचे सांगितले. त्यावर जोसेफाईन यांनी महिलेला पोलिसात तक्रार केली का, असे विचारले. त्यावर पीडितेने नाही असे उत्तर देताच महिला आयोगाच्या अध्यक्षांनी त्रास सहन करा, असे उलट पीडितेलाच सुनावले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ केरळमधील समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला.
हेही वाचा-Covid 19 New Restrictions: महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू, जाणून घ्या नवीन मार्गदर्शक सूचना
सीपीएम केडरसह केरळमधील अनेक नागरिकांनी केली राजीनाम्याची मागणी-
केरळच्या नागरिकांना जोसेफाईन यांचे उद्धट वागणूक आवडली नाही. त्यांच्यावर सर्वच स्तरामधून कठोर टीका करण्यात आली आहे. सीपीएमच्या सचिवांनी शुक्रवारी जोसेफाईन यांना राजीनामा देण्याची सूचना केली. त्यांचा पदाचा कार्यकाळ आठ महिन्यांनी संपणा होतार. मात्र, त्यांना त्यापूर्वीच राजीनामा द्यावा लागला आहे. सीपीएम केडरसह केरळमधील अनेक नागरिकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. कठोर आंदोलनापुढे झुकत सीपीएमला कठोर निर्णय घ्यावा लागला.