सोनीपत - एकीकडे जिल्हा पोलीस लोकांच्या सुरक्षिततेचे मोठे दावे करतात. तर दुसरीकडे सोनीपतमधील चोरट्यांनी पोलिसांच्या घराची चोरी केली आहे. चोरट्यांनी पोलिसांच्या घरात चोरी करून पोलिसांना आव्हान दिलं. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सोनीपतमध्ये पोलिसांच्या घरीच चोरी, जनतेची सुरक्षा रामभरोसे - सोनीपत क्राइम न्यूज
सोनीपतमधील चोरट्यांनी पोलिसांच्या घराची चोरी केली आहे. चोरट्यांनी पोलिसांच्या घरात चोरी करून पोलिसांना आव्हान दिले.
चोरट्यांनी गेल्या तीन दिवसात तीन पोलिसांच्या क्वार्टरचे कुलूप तोडून लाखो रुपयांचे दागिने चोरून नेले. प्रथम चोरी शिपाई दीपकच्या घरात घडली. दुसरी चोरी कॉन्स्टेबल मंजू यांच्या क्वार्टरमध्ये झाली. तर तिसरी चोरी शिपाई कुलदीपच्या घरात घडली. सध्या पोलिसांनी तिन्ही प्रकरणांत गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. परंतु अद्यापपर्यंत चोरट्याची ओळख पटलेली नाही.
या चोरीमुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील सर्वात सुरक्षित क्षेत्र असलेल्या पोलीस लाईनमध्ये पोलीस सुरक्षा पुरविण्यास सक्षम नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. तर जिल्ह्यातील जनतेची सुरक्षा ही रामभरोसे असल्याचं काही नागरिकांनी म्हटलं.