चेन्नई (तामिळनाडू) - माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्या फार्म हाऊसमधून अज्ञात व्यक्तींनी शनिवारी रंगीत टेलिव्हिजन संच घेऊन पलायन केल्याची घटना घडली आहे. या संबंधीच्या तक्रारीनंतर थेकरई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये प्राथमिक चौकशीत या फार्म हाऊसला स्थानिक व्यक्तीने पहारा दिला होता. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा येथे कुणीही नव्हते अशी माहिती समोर आली आहे.
O Panneerselvam Farm House: माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्या फार्म हाऊसमध्ये चोरी - Theft at former Chief Minister O Panneerselvam
माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्या फार्म हाऊसमधून अज्ञात व्यक्तींनी शनिवारी रंगीत टेलिव्हिजन संच घेऊन पलायन केल्याची घटना घडली आहे. या संबंधीच्या तक्रारीनंतर थेकरई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये प्राथमिक चौकशीत या फार्म हाऊसला स्थानिक व्यक्तीने पहारा दिला होता. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा येथे कुणीही नव्हते अशी माहिती समोर आली आहे.
![O Panneerselvam Farm House: माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्या फार्म हाऊसमध्ये चोरी माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16657697-thumbnail-3x2-panirselvam.jpg)
माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम
माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्या फार्म हाऊसमध्ये चोरी
दरोडेखोरांनी फार्म हाऊसच्या मागील बाजूने प्रवेश केला आणि कुलूप तोडून खोलीत प्रवेश केल्याचे सांगण्यात आले आहे. खोलीतील एक दूरचित्रवाणी संच गायब असून दरोडेखोर ते घेऊन पळवून गेले असल्याची माहिती समोर आली आहे. पेरियाकुलम डीएसपी गीता यांनी घटनास्थळी भेट दिली असून. फिंगरप्रिंट तज्ञांनी काही महत्त्वपूर्ण प्रिंट घेतले आहेत. तसेच, पुढील तपासही सुरू आहे अशीही माहती त्यांनी दिली आहे.