महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Death of five members of family : लॉरीच्या धडकेत एकाच कुटुंबातील पाच ठार - Death of five members of family

लॉरीने ऑटो रिक्षाला दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू ( Five members died ) झाला आहे आंध्रप्रदेशातील अन्नमय जिल्ह्यात ही घटना घडली. पती वगळता कुटुंबातील सर्व सदस्य या अपघातात ठार झाले.

Death of five members of family
Death of five members of family

By

Published : Jul 24, 2022, 9:00 AM IST

Updated : Jul 24, 2022, 9:06 AM IST

अन्नमय -लॉरीने ऑटो रिक्षाला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील पाच जण मृत्युमुखी पडल्याने ( Five members died ) हळहळ व्यक्त केली जात आहे. आंध्रप्रदेशातील अन्नमय जिल्ह्यात हा भीषण रस्ता अपघात झाला. लॉरीने ऑटोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती वगळता कुटुंबातील सर्व सदस्य ठार झाले.

केवळ एकजण वाचला - मृतांमध्ये दोन मुले, पत्नी, मावशी आणि एका नातेवाईकांचा समावेश आहे. अपघातात जखमी झालेल्या ऑटो चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मावशीच्या घरी 3 महिन्यांच्या मुलाचा धार्मिक सोहळा साजरा करून ते निघाले असताना हा अपघात झाला. रेल्वेकोदूर मंडलच्या बी.कम्मापल्ली क्रॉसरोडवर लॉरी आणि ऑटोची धडक झाली. अपघाताच्या वेळी ऑटोमध्ये सहा जण होते. या अपघातात 8 वर्षीय मुलगी, 30 वर्षीय पत्नी आणि मावशी यांचा जागीच मृत्यू झाला, तर 3 महिन्यांचा मुलगा आणि अन्य एका महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. पीडित कृष्णा रेड्डी हा वीज विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता.

हेही वाचा -Lightning struck the school : शाळा सुरु असतानाच कोसळली वीज, ३० मुलं जखमी, एक गंभीर

Last Updated : Jul 24, 2022, 9:06 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details