गाझियाबाद - उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये निर्माणाधीन छत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत आतापर्यंत तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाझियाबादमधील मुरादनगर भागातील स्मशानभूमीत छत बांधण्याचे काम सुरू होते. मात्र, अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नागरिकांच्या अंगावर निर्माणाधीन छत कोसळून हा अपघात झाला आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे निर्माणाधीन छत कोसळल्याची माहिती आहे.
मुरादनगरच्या उखलारसी गावात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मृत व्यक्तींवर अत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक स्मशानभूमीमध्ये एकत्र आले होते. यावेळी जोराचा पाऊस सुरू होते. पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी लोक तिथे उभे होते. यावेळी अचानक निर्माणाधीन छत कोसळ्याने अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबल्या गेले. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांनी आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखले झाले. एनडीआरएफच्या टीमने ढिगारा उपसण्याचं काम सुरू केलं. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 38 पेक्षा जास्त व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे. तर आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे.
योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले दुःख -