नवी दिल्ली -अमेरिकेतील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात (75)बेसिस पॉइंट्स किंवा (0.75)टक्के वाढ केली आहे. ( US Federal Reserve ) या बातमीने भारतीय बाजारालाही धक्का बसू शकतो. भारतीय चलन रुपया आणखी खाली जाऊ शकतो अशी शक्यत वर्तवली जात आहे.
1994 सालापासून व्याजदरात झालेली सर्वात मोठी वाढ - यूएस फेडरल रिझर्व्हने बुधवारी व्याजदरात वाढ केली, जी (1994)नंतरची सर्वात मोठी वाढ आहे. या वृत्तानंतर जागतिक बाजारात जोरदार हालचाल होऊ शकते. अमेरिकेतील महागाईचा दर वाढत असल्याने फेडने हा निर्णय घेतला आहे. यूएसमध्ये ग्राहक किंमत चलनवाढ (1981)पासून सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे आणि ती (8.6)टक्के आहे. अन्न आणि ऊर्जेच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाईत ही वाढ अमेरिकेत दिसून आली आहे.
फेडने आधीच इशारा दिला होता - फेड अधिकाऱ्यांनी व्याजदरात आणखी वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. कर्ज घेण्यासाठी लोकांच्या व्याजदरात वाढ होण्याचे संकेत यापूर्वीच देण्यात आले होते आणि त्याच धर्तीवर व्याजदरात ही वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा अमेरिकन शेअर बाजारावर काय परिणाम होईल यावर लक्ष ठेवणार असल्याचेही फेडने म्हटले आहे.