महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Russia-Ukraine War 26Th Day! चीनने रशियाला लष्करी मदत करु नये; अन्यथा गंभीर परिणाम -अमेरिका - रशिया युक्रेन युद्धात काय सुरू आहे

युक्रेनने म्हटले आहे की रशियाने मारियुपोलमधील आणखी एका ठिकाणई बॉम्ब टाकला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रविवारी (दि. 20 मार्च)रोजी इस्रायलला रशियाविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले. (Russia-Ukraine War 26Th Day) त्याचवेळी चीनने रशियाला लष्करी किंवा आर्थिक मदत दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही अमेरिकेने दिला आहे.

Russia-Ukraine War 26Th Day!
रशिया-युक्रेन युद्धाचा 26 वा दिवस

By

Published : Mar 21, 2022, 9:56 AM IST

किव्ह -रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज २६ वा दिवस आहे. यावेळी संपूर्ण जगाच्या नजरा या दोन देशांवर खिळल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मॉस्कोला मदत न देण्यास बीजिंगचे मन वळवण्यासाठी चिनी नेत्याशी प्रदीर्घ चर्चा केली. (Russia-Ukraine War 26Th Day 2022) जर चीनने रशियाला लष्करी किंवा आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराच अमेरिकेच्या अध्यक्षांनी दिला आहे. ( Russia could have serious consequences) त्याचवेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी इस्रायलला रशियाविरोधात कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.

आक्रमणाचा निषेध न केल्याबद्दल आपल्या देशाचा बचाव

अमेरिकेने सध्या आपले संपूर्ण लक्ष रशिया आणि युक्रेनवर केंद्रित केले आहे. रशियाने युक्रेनमध्ये रासायनिक अस्त्रांचा वापर केल्यास त्याचे अधिक परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी मॉस्कोला दिला. (Ukrainian President Volodymyr Zelenskyy ) युद्धाच्या दरम्यान, अमेरिकेतील चीनचे राजदूत चिन गेंग रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा निषेध न केल्याबद्दल आपल्या देशाचा बचाव करत आहेत. असे करून हिंसा थांबणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Vladimir Vladimirovich Putin) गेंग यांनी सीबीएस कार्यक्रम "फेस द नेशन" वर सांगितले की चीनचा निषेध करून काही फायदा होणार नाही. आणि रशियाला काही फरक पडेल असे त्यांना वाटत नाही.

जो बायडेन यांचा चिनी समकक्ष शी जिनपिंग यांना इशारा दिला

ते म्हणाले, की चीन हा रशियाचा शेजारी असल्याने त्याच्याशी मैत्रीपूर्ण आणि चांगले संबंध ठेवतो आणि त्याच्याशी 'सामान्य व्यापार, आर्थिक, आणि ऊर्जा सहकार्य' चालू ठेवेल. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात रशियाला मदत केल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गेल्या आठवड्यांत त्यांचे चिनी समकक्ष शी जिनपिंग यांना इशारा दिला होता. युक्रेनही चीनला पाश्चात्य देश आणि जपानप्रमाणे रशियाच्या आक्रमकतेचा निषेध करण्याची विनंती करत आहे. गेंग यांनी रविवारी सांगितले, की चीन रशियाला कोणतीही लष्करी मदत देत नाही. ते म्हणाले की चीन नेहमीच युद्धाच्या विरोधात आहे.

झेलेन्स्कीने इस्रायलला मदतीसाठी आवाहन

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रविवारी इस्रायलला रशियाविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले. रशियाच्या देशावरील आक्रमणाची तुलना नाझी जर्मनीच्या कृतीशी केली. इस्रायली खासदारांना संबोधित करताना, झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेन आणि रशिया यांच्यातील प्रमुख वाटाघाटीसाठी म्हणून उदयास आलेल्या इस्रायलने कोणासोबत आहे हे ठरवण्याची वेळ आली आहे.

अंतिम उपाय हा शब्द नाझी जर्मनीतील हत्याकांडासारखा

रशियावर निर्बंध लादून आणि युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करून इस्रायलने आपले मित्र पाश्चात्य देशांचे अनुकरण करावे, असे ते म्हणाले. झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर युक्रेन विरुद्ध 'अंतिम उपाय' वर काम केल्याचा आरोप केला. अंतिम उपाय हा शब्द नाझी जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात साठ लाख ज्यूंच्या नियोजित हत्याकांडासाठी वापरला होता.

नरसंहारात प्राण गमावलेल्या ज्यूंच्या स्मरणार्थ बांधलेले स्मारक

यहुदी धर्माशी संबंधित असलेल्या झेलेन्स्कीने असेही सांगितले की, रशियन क्षेपणास्त्राने बाबी यारवरही हल्ला केला आहे. बाबी यार हे 1941 च्या नरसंहारात प्राण गमावलेल्या ज्यूंच्या स्मरणार्थ बांधलेले स्मारक आहे, जे युक्रेनमध्ये आहे. दुसरीकडे, युद्धग्रस्त युक्रेनमध्ये देशभक्तीचे संदेश असलेले टॅटू आणि होर्डिंग लोकप्रिय होत आहेत. ल्विव्हमधील टॅटू पार्लरला भेट देणार्‍या ग्राहकांना युक्रेनियन ध्वज आणि इतर देशभक्तीपर चिन्हे टॅटू मिळत आहेत.

हेही वाचा -जळगावातील शिवभक्ताचे अनोखे प्रेम, घराला दिले गड - किल्ल्याचे स्वरूप.. पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details