सिंधुदुर्ग - कोरोना महामारीनंतर गोव्यात येणाऱ्या चार्टडर्ड विमानाच्या संख्यात लक्षणीय घट झाली होती. मात्र, मागच्या दोन ते तीन महिन्यात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरू झाल्यामुळें पर्यटन व्यवसायाला बरे दिवस आले होते. मात्र, युद्धामुळे पर्यटनावर पुन्हा एकदा मंदीची झळ दिसून येत आहे. राशियातून दर महिन्याला 3 ते 4 चार्टर्ड विमाने गोव्यात दाखल होत असत तेही आत्ता बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दोन्ही देशातून पर्यटकांना घेऊन येणारी चार्टर्ड विमाने बंद झाली
रशिया आणि युक्रेन युद्धाचे थेट परिणाम आत्ता गोव्याच्या पर्यटनावर होऊ लागले आहेत. दोन्ही देशातून पर्यटकांना घेऊन येणारी चार्टर्ड विमाने बंद झाली आहेत. याचाच परिणाम म्हणजे पूर्व युरोप आणि मध्य आशियातुन गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. याचा थेट परिणाम गोव्यातील 4हजाराहून अधिक असणाऱ्या लहान आणि मध्यम हॉटेल्सवर होऊ लागला आहे. तसेच शाक्स व्यवसायालाही मंदीची झळ बसली आहे.
कोविड नंतर पुन्हा एकदा संकट
कोविड महामारीनंतर गोव्यात येणाऱ्या येणाऱ्या चार्टडर्ड विमानाच्या संख्यात लक्षणीय घट झाली होती, मात्र मागच्या दोन ते तीन महिन्यात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरू झाल्यामुळें पर्यटन व्यवसायाला बरे दिवस आले होते, मात्र युद्धामुळे पर्यटनावर पुन्हा एकदा मंदीची झळ दिसून येत आहे. राशियातून दर महिन्याला 3 ते 4 चार्टर्ड विमाने गोव्यात दाखल होत असत तेही आत्ता बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.