महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Pakistan Government Twitter : पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटवर भारतात बंदी - Pakistan Government Twitter AC Withheld india

पाकिस्तान सरकारचं ट्विटर अकाउंट भारतात बंद करण्यात आले (Pakistan Government Twitter AC Withheld) आहे. हे ट्विटर अकाउंट भारतीय ट्विटर युजर्ससाठी ब्लॉक करण्यात आले (Pakistan Government Twitter AC Block India) आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Oct 1, 2022, 10:50 AM IST

Updated : Oct 1, 2022, 12:10 PM IST

नवी दिल्ली -पाकिस्तान सरकारचं ट्विटर अकाउंट भारतात बंद करण्यात आले (Pakistan Government Twitter AC Withheld) आहे. हे ट्विटर अकाउंट भारतीय ट्विटर युजर्ससाठी ब्लॉक करण्यात आले (Pakistan Government Twitter AC Block India) आहे. अनेक तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले आहे.

पीएफआय समर्थनार्थ केले होते ट्विट - भारतात पाकिस्तानच्या शाहबाज सरकारविरोधात मोठा 'डिजिटल स्ट्राइक' झाला आहे. अलीकडेच, पीएफआयवरील पाच वर्षांच्या बंदीच्या निषेधार्थ पाकिस्तानी दूतावासाच्यावतीने एक ट्विट करण्यात आले होते. सोशल मीडियावर कॅनडातील पाकिस्तानच्या दूतावासाने या कारवाईवर भारताचा विरोध केला आणि पीएफआयच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे, असे मानले जात आहे. मात्र, ट्विटरचे अधिकृत निवेदन समोर आले नाही.

दूतावासाचे ट्विट झाले होते व्हायरल -पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या समर्थनार्थ कॅनडातील पाकिस्तानच्या दूतावासाने केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वृत्तानुसार, पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासाच्या अधिकृत हँडल, व्हँकुव्हरने प्रतिबंधित पीएफआयच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. एवढेच नाही तर आक्षेपार्ह ट्विटसोबतच पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि पाकिस्तान सरकारलाही टॅग करण्यात आले होते. या ट्विटविरोधात सोशल मीडियावर लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता. ही पोस्टही चांगलीच व्हायरल झाली होती.

Last Updated : Oct 1, 2022, 12:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details