मुंबई - Vijay Diwas 2023 : दरवर्षी 16 डिसेंबर हा दिवस भारतात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 1971 मध्ये या दिवशी भारतीय सैनिकांनी पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. या युद्धाला आज 54 वर्ष पूर्ण होत आहेत. 16 डिसेंबर 1971 च्या ऐतिहासिक विजयाचा आनंद आजही प्रत्येक देशवासियांच्या हृदयात जिवंत आहे. या दिवशीच भारतानं पाकिस्तानवर मात केली होती. 16 डिसेंबर हा सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्याचा दिवस आहे. 1971 मध्ये भारतीय सैनिकांच्या शौर्यापुढे पाकिस्तानी सैन्यानं शरणागती पत्करली होती. बांगलादेशला भारतानं या दिवशी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करुन दिलं होतं. भारत आणि पाकिस्तानच्या 13 दिवसाच्या या युद्धात अनेक सैनिकांना आपला प्राण गमावला लागला होता.
भारतीय सैनिकांचा विक्रम : भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हा विजय मिळवला होता. भारतीय सैनिकांच्या शौर्याला आज संपूर्ण देश सलाम करत आहे. या दिवशी, 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धातील सर्व सहभागी माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या पत्नी आणि कुटुंबीयांना अनेक कार्यक्रमांमध्ये सन्मानित केलं जातं. फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान या नावानं भारताचे दोन भाग वेगळे करण्यात आले होते. बंगालचा मोठा भाग पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जात असे. पश्चिम पाकिस्तानचे सरकार पूर्व पाकिस्तानातील लोकांशी गैरवर्तन करत असल्यानं हे युद्ध घडलं. पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता पाहिजे होती. 24 वर्षे पूर्व पाकिस्तानवर अत्याचार हा पश्चिम पाकिस्ताननं केला होता. पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्यात भारतानं त्यांना साथ दिली.