महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महिंद्रा थारच्या लिलावातून मंदिराने कमवले 'इतके' लाख रुपये - Thar donated by Mahindra

केरळमधील प्रसिद्ध गुरुवायूर मंदिरात थार जीपचा लिलाव करण्यात आला. या जीपसाठी एका व्यवसायिकाने तब्बल 43 लाखांची बोली लावली आहे. ही जीप महिंद्रा ग्रुपने भेट म्हणून अर्पण केली होती.

थार
थार

By

Published : Jun 6, 2022, 10:09 PM IST

तिरुवनंतपुरम ( केरळ ) - केरळमधील त्रिशूर येथील प्रसिद्ध गुरुवायूर श्री कृष्ण मंदिराला महिंद्रा ग्रुपने भेट दिलेल्या थार जीपला सोमवारी (दि. 6 जून) झालेल्या लिलावात तब्बल 43 लाख रुपयांची बोली लागली. या लिलावात 14 लोकांनी भाग घेतला होता. विघ्नेश विजयकुमार या दुबईस्थित व्यापाऱ्याच्या वतीने त्यांचे वडील विजयकुमार यांनी अखेरची बोली लावली.

महिंद्रा थारच्या लिलावातून मंदिराने कमवले 'इतके' लाख रुपये

या वाहनाचा पहिल्यांदा लिलाव करण्यात आला होता. अनिवासी भारतीय व्यापारी अमल मुहम्मद यांनी 15.10 लाख रुपयांची बोली लावली होती. मात्र, हा लिलाव घाईगडबडीत झाल्याचा आरोप करत एका हिंदू संघटनेने लिलावाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने पुन्हा एकदा लिलाव प्रतिक्रिया राबवायचे आदेश दिले. यावेळी गुरुवायूर देवस्थानने लिलावासाठी चांगला प्रचार केला होता. त्यामुळे यंदाच्या लिलावात 14 लोकांनी सहभाग घेतला होता. तब्बल 43 लाखाला बोली लागली.

हेही वाचा -Video : नियंत्रण सुटल्याने चारचाकीने तीन दुचाकींना उडवले, दुचाकीस्वाराचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details