नवी दिल्ली -ज्या घटनेने संपुर्ण देश हळहळला होता. ती घटना म्हणजेलखीमपूर खेरी येथील झालेला हिंसाचार. या हिसाचाराप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांना अटक झाली होती. ( Union Minister Ajay Mishra ) त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. आता दाखल असलेल्या याचिकेवर हा जामीन रद्द करण्याबाबत सर्वोच्च न्यायालय आज सोमवारी(दि. 18 एप्रिल)रोजी आपला आदेश देणार आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ निकाल सुनावण्याची शक्यता आहे.
अनावश्यक तपशीलांमध्ये जाऊ नये - आशिष मिश्रा यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारी याचिका शेतकऱ्यांनी दाखल केलेली आहे. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने (४ एप्रिल)रोजी निर्णय राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आशिष मिश्रा यांना जामीन देण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते. (Chief Justice N. V. Ramana) त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, यामध्ये खटला सुरू व्हायचा असताना अनावश्यक तपशीलांमध्ये जाऊ नये.
प्रशांत भूषण यांच्या निवेदनाची दखल - न्यायमूर्ती सूर्यकांत आणि हिमा कोहली यांचा समावेश असलेल्या विशेष खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या एसआयटीने सुचविल्याप्रमाणे उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध राज्य सरकारने अपील दाखल केले नाही याचीही तीव्र दखल घेतली होती. (Supreme Court Ashish Mishra Bail Cancellation) शेतकऱ्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे आणि प्रशांत भूषण यांच्या निवेदनाची खंडपीठाने दखल घेतली.
गाडीने चार शेतकऱ्यांना चिरडले होते - 10 मार्च रोजी मुख्य साक्षीदारावर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी साक्षीदारांचे संरक्षण सुनिश्चित करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या या भागात शेतकरी निदर्शने करत असताना उसळलेल्या हिंसाचारात लखीमपूर खेरी येथे आठ जणांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एफआयआरनुसार, एका गाडीने चार शेतकऱ्यांना चिरडले, ज्यामध्ये आशिष मिश्रा बसले होते.