मुंबई - विकली एक्सपायरीच्या दिवशी म्हणजे आज (दि. 21 एप्रिल)रोजी शेअर बाजाराने सकारात्मक ओपनिंग दिले. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक आजच्या दिवसाच्या सुरुवातील वधारले आहेत. सेन्सेक्स 421.1अंकांनी वधारून 57,458.60वर सुरु झाला, तर निफ्टी 98.05 अंकांनी वधारून 17,234.60 सुरु झाला. निफ्टी 50 मधील 44 शेअर्समध्ये दिवसाच्या सुरुवातील घट झाली. तर, केवळ 6 शेअर्समध्ये वधारल्याचे पाहायला मिळाले आहे. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला हे शेअर्स टॉप गेनर्स ठरले आहेत. तर,या शेअर्समध्ये घट झाल्याचं पाहायला मिळाले.
1.05 टक्क्यांच्या वाढीसह 17,136.50 बंद - काल बुधवारी भारतीय शेअर बाजाराच्या मागच्या 5 दिवसांच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. या तेजीत ऑटो, ऑईल अँड गॅस, आयटी, फार्माशिवाय एचडीएफसी आणि रिलायन्सच्या शेअर्सचे मोठे योगदान राहिले. दिवसाअंती सेन्सेक्स 574.35 अंकांच्या अर्थात 1.02 टक्क्यांच्या वाढीसह 57,037.50 वर बंद झाला. तर दुसरीकडे निफ्टी 177.80 अंकाच्या अर्थात 1.05 टक्क्यांच्या वाढीसह 17,136.50 बंद झाला.