सांगली - मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील 9 जणांनी विष घेवून सामूहिक आत्महत्या ( 9 people commit suicide by consuming poison ) केल्याची घडली आहे. नेमके कोणत्या कारणातून ही आत्महत्या झाली, याची माहिती अद्यापही समजू शकली नाही. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन सुरू आहे.
म्हैसाळ गावातील नरवाड रोड,अंबिका नगर चौंडजे मळा आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या दोन ठिकाणी एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पशु वैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लप्पा वनमोरे आणि त्यांचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे यांच्यासह त्यांची आई, पत्नी आणि मुलांचा समावेश आहे. डॉ. माणिक यल्लप्पा वनमोरे, पत्नी रेखा माणिक वनमोरे, आई आकताई यल्लप्पा वनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक वनमोरे, मुलगा आदित्य माणिक वनमोरे, पुतण्या शुभम पोपट वनमोरे यांनी राजधानी हॉटेल जवळ तर दुसऱ्या घरात डॉ. माणिक यांचा भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे, संगीत पोपट वनमोरे, मुलगी अर्चना पोपट वनमोरे यांचे घरात मृतदेह आढळून आले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.
भिंड येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका दूध व्यापाऱ्याने कुटुंबासह गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबातील एक मुलगी वाचली, ती बेशुद्ध झाल्यानंतर मृत झाली होती. ( Bhind Mass Suicide ) पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले असले तरी आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याआधीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, जाणून घेऊया त्या घटनांबद्दल-
भिंड जिल्ह्यातील गोहडभागातील संपूर्ण कुटुंबाने अचानक आत्महत्या केल्याची बातमीने संपूर्ण जिल्हा हादरला, काठमा गुजर गावातील शेतकरी धर्मेंद्र गुर्जर यांनी पत्नी आणि दोन निष्पाप मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केली. ( Bhind Mass Suicide ) या घटनेत धर्मेंद्र यांच्यासह पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला, तर निष्पाप लहान मुलगी बचावली, तिच्यावर ग्वाल्हेरमध्ये उपचार सुरू आहेत.
बुराडी कांड - बुरारी सामूहिक आत्महत्येची घटना 2018 मध्ये घडली होती, परंतु ही घटना आजपर्यंत एक न उलगडलेले गूढ आहे. अशीच एक धक्कादायक घटना दिल्लीतील बुरारी येथे एका कुटुंबातील 11 जणांनी एकत्र आत्महत्या केली, आत्महत्या केलेल्या 11 जणांमध्ये ललित (45), त्याचा मोठा भाऊ भावनेश सिंग (50), त्यांच्या पत्नी टीना (42) आणि भावाचा समावेश होता. पत्नी सविता (48), मुले नीतू (25), मोनू उर्फ मेनका (23), ध्रुव उर्फ दुष्यंत (15), शिवम (15), त्याची बहीण प्रतिभा उर्फ बेबी (48) आणि त्यांची मुलगी प्रियांका (33) यांचा समावेश होता.