चेन्नई (तामिळनाडू) - तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि (AIADMK) नेत्या जयललिता यांच्या मृत्यूप्रकरणी नवे खुलासे समोर आले आहेत. अरुमुगासामी चौकशी समितीचा अहवाल आज मंगळवार (दि. 18 ऑक्टोबर)रोजी तामिळनाडू विधानसभेत मांडण्यात आला. जयललिता यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा 5 डिसेंबर रोजी करण्यात आली, तर अरुमुगासामी आयोगाने पुराव्याच्या आधारे 4 डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.
ही समिती तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि (AIADMK)नेत्या जे जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करत होती. विधानसभेत सादर केलेल्या अहवालानुसार, शशिकला यांच्यासह तत्कालीन आरोग्य सचिव राधाकृष्णन यांनी केएस शिवकुमार आणि तत्कालीन आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर यांच्याविरोधात चौकशीची शिफारस केली आहे. समितीने सादर केलेल्या अहवालात दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूची वेळ लक्षणीय असून त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. जयललिता यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा 5 डिसेंबर रोजी करण्यात आली, तर अरुमुगासामी आयोगाने पुराव्याच्या आधारे 4 डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.
माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूची वेळ 5 डिसेंबर 2016 रोजी रात्री 11:30 वाजता रुग्णालयाने अधिकृतपणे घोषीत केले. जयललिता यांच्या अखेरच्या काळात हॉस्पिटलमध्ये त्यांची देखभाल करणाऱ्या पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची साक्ष यावेळपेक्षा खूपच वेगळी आहे. 04.12.16 रोजी दुपारी 3.50 च्या आधी दिवंगत मुख्यमंत्र्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. अहवालात म्हटले आहे, की त्यांच्या प्रकृतीचे निरीक्षण करणाऱ्या परिचारिका, तंत्रज्ञ आणि कर्तव्यदक्ष डॉक्टरांनी स्पष्टपणे साक्ष दिली आहे, की 04.12.16 रोजी दुपारी 3:50 नंतर हृदयाची क्रिया झाली नाही आणि रक्त प्रवाह नाही असही त्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.