नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)च्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना महामारीमुळे झालेल्या नुकसानातून भारतीय अर्थव्यवस्थेला पूर्णपणे सावरण्यासाठी एक दशकापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. (Conomy Lost During Corona Epidemic) या महामारीचा अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामाचे विश्लेषण समोर आलेल्या अहवालात करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला सुमारे 52 लाख कोटी रुपयांचे उत्पादन नुकसान झाले अशी माहितीही यामध्ये देण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या (2021-22)च्या 'रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स (RCF)' च्या अध्याय ( Epidemic Marks )मध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यानुसार, कोरोना महामारीच्या वारंवार येणाऱ्या लाटांमुळे निर्माण झालेली अराजकता अर्थव्यवस्थेच्या स्थिर पुनरुज्जीवनाच्या मार्गात आली. सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) तिमाही ट्रेंडमध्येही चढ-उतार झाला आहे असही निरिक्षण त्यामध्ये नोंदवण्यात आले आहे.
या अहवालात म्हटले आहे की, (2020-21)या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महामारीच्या पहिल्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेत खोलवर आकुंचन निर्माण झाले होते. (India Economic Losses Corona Epidemic) मात्र, त्यानंतर अर्थव्यवस्थेने वेग घेतला. पण (2021-22)च्या एप्रिल-जून तिमाहीत आलेल्या महामारीच्या दुसऱ्या लाटेचा त्यावर खोलवर परिणाम झाला. त्यानंतर जानेवारी (2022)मधील तिसऱ्या लाटेने पुनरुज्जीवन प्रक्रियेत अंशतः व्यत्यय आणला असही यामध्ये म्हटले आहे.