महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Wrestlers Protest: आंदोलक पैलवानांचा छळ सुरूच! लोकांचा पाठिंबा वाढतोय; सरकार मात्र गप्पचं

दिल्लीतल्या जंतरमंतरवर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात पैलवानांचे धरणे आंदोलंन सुरू आहे. या महिला कुस्तीगीरांनी बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केलेले आहेत. दरम्यान, हे प्रकरण आता सुप्रिम कोर्टात गेलेले आहे. त्यावर काय निर्णय होते हे काळ येणारा काळ ठरवेल. मात्र, सध्या या प्रकरणात पोलिसांचे वर्तन हे आमच्याशी खूप वाईट आहे अशी या आंदोलकांची भावना आहे.

Wrestlers Protest
जंतर मंतरवर पैलवानांचे आंदोलन

By

Published : May 4, 2023, 9:30 PM IST

नवी दिल्ली :गेल्या काही दिवसांपासून भारताच्या खिलाडू महिला जंतर-मंतरवर आंदोलनाला बसल्या आहेत. त्यांची कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. मात्र, त्यांच्या या तक्रारीला सत्ताधारी भाजपने आणि पोलीस व्यवस्थेनेही गांभिर्याने घेतले नसल्याचे रोज दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या पैलवान आंदोलकांना पोलिसांनी त्यांच्या अधिकाराने त्या ठिकाणी आंदोलन करण्यासही मोठा अडथळा निर्माण केल्याचे आंदोलकांचे मत आहे.

कुस्तीपटूंच्या कथित मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल : काल बुधवार रात्री या कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये रात्री तूफान राडा झाला. प्रचंड गोंधळाच्या दरम्यान, पदक विजेत्या कुस्तीपटूंनी लोकांना त्यांच्या समर्थनासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. कुस्तीपटूंनी त्यांच्यावर पोलिसांनी हल्ला केल्याचाही आरोप केला आहे. या घटनेत आंदोलक पैलवानाच्या कपाळावर मोठी जखम झाली आहे. त्याला दारुच्या नशेतील एका पोलीस कर्मचाऱ्यानं मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे दिल्लीतील वातावर तंग झाले आहे. आम आदमी पार्टीचे नेते सोमनाथ भारती यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार त्यांनी आंदोलनकर्त्या पैलवानांसाठी फोल्डिंग बेड्स आणले होते. पण पोलिसांनी त्यास आक्षेप घेऊन पैलवानांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात येत आहे. कुस्तीपटूंच्या कथित मारहाणीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

कुस्तीपटू गीता फोगटला पोलीसंनी अडवले

कुस्तीपटू गीता फोगटला पोलीसंनी अडवले : आज 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारी कुस्तीपटू गीता फोगटला जंतर-मंतरवर जाण्यासापासून अडवले. भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंच्या निषेधात सहभागी होण्यासाठी ती पती पवन सरोहा यांच्यासोबत जंतरमंतरला जात होती. परंतु, पोलिसांनी तील जाण्यास मनाई केली. गेल्या २३ एप्रिलपासून जंतरमंतरवर हे पैलवान आंदोलन करत आहेत. ब्रिजभूषण यांच्या अटकेची तसेच डब्ल्यूएफआयच्या पदावरून त्यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी ते निषेध करत आहेत.

भीम आर्मीचा पाठिंबा : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर गुरुवारी सायंकाळी जंतरमंतरवर सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या धरणे येथे पोहोचले. आंदोलकांना संबोधित करताना चंद्रशेखर म्हणाले की, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग, ज्यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे, त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी. त्यांना अटक करण्यासाठी सरकारकडे सात दिवसांचा अवधी आहे. या सात दिवसांत पोलिसांनी ब्रिजभूषणला अटक केली नाही, तर आठव्या दिवशी आम्हीही पोत्या आणि अंथरूण घेऊन इथे येऊ. त्यानंतर पीडित महिला कुस्तीपटूंना न्याय मिळेल तेव्हाच आम्ही येथून उठू असही ते म्हणाले आहेत.

न्यायासाठी संघर्ष करावा लागेल : देशाची प्रतिष्ठा उंचावणाऱ्या मुलींवर अन्याय करणाऱ्या खासदारावर कारवाई होत नसताना चंद्रशेखर म्हणाले. त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जावे लागत असेल तर, सामान्य मुलींसोबत काय होईल? याची कल्पना करा. चंद्रशेखर म्हणाले की, सरकार आणि दिल्ली पोलीस ब्रिजभूषण सिंह यांना वाचवत आहेत. बुधवारी रात्री पोलिसांनी महिला कुस्तीपटूंसोबत ज्या प्रकारे बळाचा वापर केला, त्यावरून आता न्याय मागून न्याय मिळणार नाही, असे दिसते. न्यायासाठी संघर्ष करावा लागतो. सर्वांनी संघर्षासाठी सज्ज व्हावे, असे ते म्हणाले आहेत.

काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा

पोलिसांच्या गैरवर्तनाचा आरोप : काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा यांनी दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटूंसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास दीपेंद्र हुड्डा जंतरमंतरवर पोहोचले आणि त्यांनी पैलवानांची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी बराच वेळ पैलवानांशी चर्चा केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, रात्री उशिरा दिल्ली पोलिसांनी धरणावर बसलेल्या पैलवानांना मारहाण केली. यामध्ये अनेक पैलवानांना दुखापत झाली आहे. क्रीडापटूंच्या मुलींची विचारपूस करण्यासाठी मी रात्री जंतर-मंतरवर पोहोचल्यावर दिल्ली पोलिसांनी मला ताब्यात घेऊन वसंत विहार पोलीस चौकीत आणले असही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

लोकांचा वाढता पाठिंबा

लोकांचा वाढता पाठिंबा : भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपावरून जंतरमंतरवर सुरू असलेले धरणे हळूहळू शेतकरी आंदोलनाचे रूप धारण करत आहे. बुधवारी रात्री उशिरा आंदोलकांशी हाणामारी झाल्याच्या घटनेनंतर वातावरणात बदल झाला असून, येथे लोकांची ये-जा वाढली आहे. आंदोलनाच्या ठिकाणी लोक मोठ्या संख्येने पोहोचले. पंजाबमधील लोकही आंदोलनस्थळी पोहोचत आहेत. मात्र, पोलीस वेळोवेळी आंदोलनस्थळी येण्यापासून लोकांना रोखत आहेत. धरणाच्या ठिकाणी जाण्यासाठी सध्या एकच रस्ता खुला आहे. इतर सर्व मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत. दिल्ली विद्यापीठातील महिला आणि विद्यार्थीही मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी पोहोचत आहेत आणि आंदोलकांना पाठिंबा देत आहेत.

कुस्तीपटूंची पत्रकार परिषद

आमचा लढा अटक होत नाही तोपर्यंत चालू राहणार : दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे आंदोलन सलग 12 व्या दिवशीही सुरूच आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत बुधवारी सुप्रीम कोर्टात कुस्तीपटूंची सुनावणी होणार असून, सुप्रीम कोर्टाच्या वतीने कुस्तीपटूंना खालच्या कोर्टात जाण्यास सांगण्यात आले आहे. जंतरमंतर येथे रात्री उशिरा घडलेल्या घटनांनंतर कुस्तीपटूंनी सायंकाळी उशिरा पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, रात्री आमच्यासोबत खूप वाईट झाले आहे. वेळ आली तर आम्ही पदकेही परत करू. यावेळी बजरंग पुनिया म्हणाले की, आमच्या या मुद्द्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने राजकारण करू नये, फक्त आम्हाला पाठिंबा द्या. आमचा लढा फक्त ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याशी आहे, कोणत्याही सरकारशी नाही. जोपर्यंत कुस्ती महासंघाचे अध्यक्ष तुरुंगात जात नाहीत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. जोपर्यंत दम आहे तोपर्यंत आपण इथेच बसू असही ते यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा :Anil Dujana Killed In Encounter: यूपी एसटीएफची मोठी कारवाई! कुख्यात गुंड अनिल दुजाना एनकाउंटरमध्ये ठार

ABOUT THE AUTHOR

...view details