नवी दिल्ली -इंदिरा गांधी स्टेडियमवर (44)व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडची टॉर्च रिले सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रिलेचा शुभारंभ केला. यावेळी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हेही उपस्थित होते. बुद्धिबळ ऑलिम्पियाडपूर्वी टॉर्च रिलेचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी 43 बुद्धिबळ ऑलिम्पियाड झाले आहेत. परंतु. आतापर्यंत टॉर्च रिलेचे आयोजन करण्यात आले नव्हते. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये १८८ देशांतील दोन हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.
बुद्धिबळ ऑलिम्पियाड 28 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत महाबलीपुरम येथे होणार आहे. यामध्ये 187 देशांतील विक्रमी 343 संघ खुल्या व महिला गटात सहभागी होणार आहेत. दरम्यान, ही मशाल रिले केवळ भारतासाठीच नव्हे, तर खेळाच्या गौरवशाली वारशासाठी देखील आहे," असे पंतप्रधान मोदी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. बुद्धिबळ हा खेळ आपल्या जन्मस्थानी एक मोठा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम म्हणून साजरा केला जात आहे आणि आता जगभरातील लोकांसाठी हा खेळ आवडला आहे याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.