महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Discussion On President Address In Lok Sabha : लोकसभेसह राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज चर्चा; राहुल गांधी सरकारला घेरणार

लोकसभेसह राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज चर्चा होणार आहे. (Discussion On President Address In Lok Sabha) विरोधकांच्या वतीने धन्यवाद प्रस्तावावर राहुल गांधी बोलणार आहेत. (Rahul Gandhi will speak on the budget 2022) संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा ३१ जानेवारी ते ११ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यानंतर विविध विभागांच्या अर्थसंकल्पीय वाटपाचा विचार करण्यासाठी सुट्टी असेल. (The President's address will be discussed in the Lok Sabha ) अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा १४ मार्चपासून सुरू होणार असून तो ८ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

लोकसभेसह राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज चर्चा
लोकसभेसह राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज चर्चा

By

Published : Feb 2, 2022, 10:56 AM IST

मुंबई - संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये (लोकसभा आणि राज्यसभा) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर आजपासून चर्चा सुरू होणार आहे. (The President's address will be discussed in the Lok Sabha today) यामध्ये भाजपच्या वतीने राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर लोकसभेत बोलणारे पहिले वक्ते उत्तर प्रदेशातील बस्ती येथील लोकसभा खासदार हरीश द्विवेदी असतील.

राहुल गांधी पेगाससच्या मुद्द्यावरही बोलण्याची शक्यता

काँग्रेस हा सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. (Rahul Gandhi will discuss on behalf of the opposition) त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलणार आहेत. यामध्ये गांधी राष्ट्रपतींच्या भाषणावर, अर्थसंकल्पावर याबरोबरच पेगाससच्या मुद्द्यावरही बोलण्याची शक्यता आहे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

आपण अगोदर सभागृहात बोलू

काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना संसदेबाहेर आंदोलन करण्यास सांगितले असून त्यामध्ये पेगाससचा मुद्दा उपस्थित करण्यास सांगितले आहे. (Saamana Editoral On Union Budget 2022) दरम्यान, पत्रकारांनी राहुल गांधी यांना अर्थसंकल्प आणि अध्यक्षीय भाषणावर प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी आपण अगोदर सभागृहात बोलू अशी प्रतिक्रिया दिली.

हरीश द्विवेदी यांच्यावर जबाबदारी

राज्यसभेत समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला म्हटल्या जाणार्‍या आणि मागासलेल्या जातीतील इटावा येथून निवडूण आलेल्या गीता शाक्य उर्फ ​​चंद्रप्रभा या पहिल्या वक्त्या असतील. ( Finance Minister Nirmala Sitharaman ) तसेच, हरीश द्विवेदी यांच्यानंतर भाजपने पक्षाच्या वतीने ठरावाच्या समर्थनार्थ बोलण्याची जबाबदारी उत्तर प्रदेशातीलच बनसगावचे लोकसभा खासदार कमलेश पासवान यांच्यावर सोपवली आहे.

राज्यसभा खासदार श्वेत मलिक बोलणार

राज्यसभेत भाजपच्या वतीने, ठरावाच्या बाजूने बोलणारे दुसरे वक्ते पंजाबमधून आहेत. गीता शाक्य यांच्यानंतर राज्यसभेत बोलणारे भाजपचे दुसरे वक्ते पंजाबचे राज्यसभा खासदार श्वेत मलिक असतील. मलिक हे पंजाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिले असून ते राज्यातील दिग्गज नेते मानले जातात.

धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देण्याची शक्यता

7 फेब्रुवारीला लोकसभेत आणि 8 फेब्रुवारीला राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देऊ शकतात. राज्यसभेची (वरिष्ठ सभागृह) बैठक सकाळी १० वाजता सुरू होईल. कोरोना महामारीमुळे दोन्ही सभागृहांची बैठक वेगवेगळ्या वेळी होणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एकूण 29 बैठका होणार

आजपासून (२ फेब्रुवारी)रोजी लोकसभेचे कामकाज दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या वतीने लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलणारे पहिले आणि दुसरे वक्ते उत्तर प्रदेश या सर्वात महत्त्वाच्या निवडणुकीतील राज्याचे असतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एकूण 29 बैठका होणार असून त्यात पहिल्या टप्प्यात 10 तर दुसऱ्या टप्प्यात 19 बैठका होणार आहेत.

हेही वाचा -अर्थसंकल्पात सामान्य लोकांच्या अपेक्षांचा चक्काचूर, सामना'तून मोदी सरकारवर प्रहार

ABOUT THE AUTHOR

...view details