नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी यावर्षी 128 पद्म पुरस्कारांना मान्यता दिली आहे. या १२८ जणांच्या यादीत महाराष्ट्रातील १० जणांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील पद्म विभूषण पुरस्कारार्थी
कला क्षेत्रातून महाराष्ट्रातील प्रभा अत्रे यांचा एकमेव समावेश पद्म विभूषण पुरस्कारार्थींच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्रातील पद्म भूषण पुरस्कारार्थी
औद्योगिक क्षेत्रात नटराजन चंद्रशेखरण तसेच पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला यांना पदं भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कारार्थी
वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. भीमसेन सिंघल, डॉ. हिम्मतराव बाविस्कर व डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे, कला क्षेत्रातील योगदानाबाबत सुलोचना चव्हाण तसेच प्रसिद्ध गायक सोनू निगम, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबाबत अनिल कुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबाबत बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.