मुंबई - पंतप्रधान मोदी यांनी अलीकडे संसदेत भाषणे केली. आम्ही आहोत म्हणून देश आहे असाच सूर त्यांच्या बोलण्यातून दिसला. पाच राज्यांत निवडणुका आहेत. त्यामुळे संसदेच्या व्यासपीठावरून मोदी यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रचाराचे भाषण केले. (Narendra Modi In Rajya Sabha) त्याचवेळी संसदेत त्यांच्याच मंत्र्याने माहिती सादर केली की, 'गेल्या दोन वर्षांत गरिबी व आर्थिक तंगीस कंटाळून पंचवीस हजार लोकांनी आत्महत्या केल्या.' हा सरकारी आकडा आहे. खरा आकडा लाखोंत असू शकतो. (Modi Govt On Samana Editorial) आपल्या भाषणात पंतप्रधानांनी या अशा प्रश्नांवर काहीच भाष्य केले नाही. साडेचार कोटी बेरोजगार नव्याने निर्माण झाले व त्यातून असंतोषाचा भडका उडणार आहे. (China Flag Hoisted In Galwan Valley) पण नेहमीप्रमाणे त्यांनी जाहीर केले की, ज्या पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्या राज्यांत भारतीय जनता पक्षाची लाट उसळली आहे व निवडणुका आपणच जिंकणार.
आज सात वर्षांत तीच संसद व लोकशाही अश्रू ढाळत असेल!
देशाच्या पंतप्रधानांनी भाषण कसे करावे? भाषण निःपक्ष असावे. (Modi On Rahul Gandhi) संसदेत बोलताना कोणती पथ्ये पाळावीत याचे राजकीय संकेत ठरलेले आहेत. मोदी यांनी प्रथम संसदेत पाऊल ठेवले तेव्हा त्यांनी संसदेच्या पायरीवर डोके ठेवून अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती. आज सात वर्षांत तीच संसद व लोकशाही अश्रू ढाळत असेल! इतके अराजक माजवले गेले आहे अशी जहरी टीका आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
काँग्रेस अनेक राज्यांत कमजोर झाली, पण तरीही काँग्रेसवर हल्ले करायचे
संसदेपासून बाहेर सार्वजनिक व्यासपीठावरून पंडित नेहरू, गांधी, काँग्रेस यावर बेताल तोंडसुख घेणे म्हणजे राज्य करणे नव्हे. उत्तर प्रदेशातील निवडणुका कठीण जात आहेत. म्हणून कर्नाटकात 'हिजाब'वरून दंगे पेटवले जात आहेत. 'हिजाब' हा काही दंगे पेटविण्याचा, हिंदू-मुसलमानांत भडके उडविण्याचा विषय होऊ शकत नाही. (Prime Minister Narendra Modi fears Congress party) पण हिंदू, मुसलमान, हिंदुस्थान-पाकिस्तान असे खेळ केल्याशिवाय या लोकांना निवडणुका लढवता येत नाहीत. काँग्रेस अनेक राज्यांत कमजोर झाली, पण तरीही काँग्रेसवर हल्ले करायचे. (Rahul Gandhi on Narendra Modi) सात वर्षांत आपण काय केले हे सांगण्यासारखे नसल्याने काँग्रेसने काही केले नाही, असे सांगावे लागते असा टोलाही लगावला आहे.
आता प्रचारात गोव्यास आत्मनिर्भर, स्वर्णीम गोवा बनविण्याचे बोलले जात आहे
हे त्याचे महत्त्वाचे उदाहरण. नेहरू नसते तर गोवा 1947 सालीच स्वतंत्र झाला असता, असे मोदी-शहा सांगतात. गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून उशिरा सुटला याचे खापर काँग्रेसवर फोडले हे ठीक, पण महाराष्ट्रातून, बिहारातून जे स्वातंत्र्यसैनिकांचे जथे गोव्यात पोहोचले त्यात संघ परिवाराचे किती लोक छातीवर गोळ्या झेलण्यासाठी पुढे होते? गोव्यात भाजपच्या काळात पराकोटीचा भ्रष्टाचार बोकाळला आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीच गोव्यातील भ्रष्टाचाराचा स्फोट केला. (Discussion On President Address In Lok Sabha) आता प्रचारात गोव्यास आत्मनिर्भर, स्वर्णीम गोवा बनविण्याचे बोलले जात आहे. पंतप्रधानांच्या भाषणांचे संग्रह ग्रंथरूपात प्रसिद्ध होत असतात. कारण संदर्भग्रंथ म्हणून त्याचा उपयोग होत असतो. पण मोदी यांच्या भाषणांचा जर ग्रंथ निघाला तर त्यातील काही भाषणे गाळावी लागतील. कारण त्यात काही चुका आहेत. तेव्हा पंतप्रधानांचे भाषण बिनचूक असावे याचे भान काटेकोरपणे ठेवले गेलेच पाहिजे. मात्र पंतप्रधान मोदी यांना जे लोक भाषणे लिहून देतात त्यांनी मोदींना खोटे पाडायचे कंत्राट घेतलेले दिसते असे फटकारे आजच्या सामनातून मारले आहेत.