दावणगेरे (कर्नाटक) - कर्नाटकातील दावणगेरे येथे एका 78 वर्षीय व्यक्तीने आपल्या 70 वर्षीय पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दावणगेरे येथील आझाद नगर पोलीस ठाण्यांतर्गत हेगडे नगरमध्ये काल रविवार (10 ऑक्टोबर)रोजी रात्री ही घटना घडली आहे. दुसरीकडे, वृद्ध महिलेची हत्या झाल्याच्या घटनेने ईद मिलादचा सण साजरा करणारे शेजारी भयभीत झाले आहेत.
Murdwred Wife: वृद्धाने केली पत्नीची निर्घृण हत्या; कर्नाटकातील घटना - कर्नाटकमध्ये वृद्धाने केली पत्नीची हत्या
कर्नाटकातील दावणगेरे येथे एका वृद्धाने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
![Murdwred Wife: वृद्धाने केली पत्नीची निर्घृण हत्या; कर्नाटकातील घटना वृद्धाने केली पत्नीची निर्घृण हत्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16608747-thumbnail-3x2-karnatak.jpg)
ईद मिलाद साजरी - चमन साब (78) यांनी पत्नी शकीराबानू (70) यांचा गळा चिरून खून केला आहे. हे वृद्ध जोडपे गेल्या 50 वर्षांपासून एकत्र राहत होते. या दाम्पत्याला दोन मुलं झाल्यानंतरही ते त्यांच्या संमतीशिवाय वेगळे राहत होते. प्लास्टरचे काम करणाऱ्या चमन साब यांना मानसिक आजार असल्याने मुलांनी त्यांना कामावर जाऊ दिले नाही. घरीच राहायला सांगितले. रविवारी ईद मिलाद साजरी केल्यानंतर दोघांमध्ये किरकोळ भांडण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर वृद्धाने पत्नीचा गळा चिरून खून केला.
अनेक वर्षांपासून मानसिक आजार - मृतदेह शवविच्छेदनासाठी दावणगेरे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याचे मृताचा मुलगा मोहम्मद अली यांनी सांगितले. त्याचवेळी आझाद नगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच एसपी सीबी रिष्यंत यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अशी माहिती समोर आली आहे, की वयोवृद्ध चमन साब यांना अनेक वर्षांपासून मानसिक आजार आहे, याची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी वृद्धाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.