छत्तरपूर:छतरपूर जिल्ह्यात (Chhatarpur District) मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Chief Minister Shivraj Singh Chouhan) यांना चवहीन आणि थंड चहा पुरवल्याबद्दल कनिष्ठ पुरवठा अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर ही नोटीस मागे घेण्यात आली आहे.
काँग्रेसचा टोला : चायवाल्यांचा तिरस्कार कशाला?, असा सवाल काँग्रेसने मुख्यमंत्री चौहान यांना केला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान रीवाला जाताना छतरपूर जिल्ह्यातील खजुराहो विमानतळावर थांबले. जिथे त्यांना दिलेला चहा चवहीन आणि थंड होता. या संदर्भात राजनगर येथील कनिष्ठ पुरवठा अधिकारी राकेश कान्हावा यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.