गुवाहाटी:महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात (Maharashtra Political Crisis) वेगवेगळ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. यात आज दुपारच्यावेळी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हाॅटेल परीसरात काही आमदारांच्या सोबत फेरफटका मारताना दिसले पत्रकारांनी त्यांना बोलण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी आमची भुमिका आणि आमचे पुढचे प्लॅन या बद्दल आमच्या गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर तुम्हाला वेळो वेळी माहिती देत असतात. तुम्ही निश्चिंत रहा असे सांगताना त्यांनी आम्ही शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पुढे घेउन जात आहोत. याचा पुनरुच्चार केला.
Maharashtra Political Crisis : त्या आमदारांची नावे जाहीर करावे उगाच आकडे सांगू नयेत - शिंदेचे आव्हान - शिंदेचे आव्हान
आम्ही शिवसेना पुढे घेऊन जात आहोत. माझ्या सोबत 50 आमदार असुन ते सगळे मजेत आहेत. इथले काही आमदार संपर्कात आहेत अशी माहिती बाहेरुन येत आहे. पण त्यांनी केवळ आकडे सांगु नयेत (not just numbers) तर त्या आमदारांची नावे जाहीर करावीत (The names of those MLAs should be made public) असे आव्हान (Shindes challenge) शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहे.
एकनाथ शिंदे
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, आमच्याकडे 50 आमदार आहेत, आम्ही शिवसेना पुढे घेऊन चाललोय लवकरच पुढचे पाऊल उचलणार आहोत. माझ्या सोबत असलेले सगळे 50 आमदार मजेत आहेत. त्यांच्यावर कोणताही दबाव नाही. आमच्या पैकी काही आमदार त्यांच्या संपर्कात आहेत अशी माहिती बाहेरुन कळते आहे. पण त्यांनी केवळ आकडे न सांगता कोणते आमदार त्यांच्या सपर्कात आहेत त्यांची नावे जाहिर करावी असे आव्हान दिले आणि कोणिही कोणाच्या संपर्कात नाही असे स्पष्ट केले.
Last Updated : Jun 28, 2022, 2:07 PM IST