नवी दिल्ली - उष्णतेचा सामना करणाऱ्या उत्तर-पश्चिम भारताला सोमवारपासून काही दिवस थोडासा दिलासा मिळू शकतो. या भागात पाऊसासर मोठे वादळ येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ( strong winds of 40 kmph in India for the next 24 hours) दरम्यान, येत्या 24 तासांत 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे कमाल तापमानात घट होणार आहे. विभागाचे वरिष्ठ अधिकारी आरके जेनामानी यांनी सांगितले की, वेस्टर्न डिस्टर्बन्स दिल्लीकडे सरकत आहे. दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणासह संपूर्ण उत्तर-पश्चिम भारतात पाऊस आणि गडगडाटाचा इशाराही देण्यात आला आहे.
५ मेपर्यंत या भागात ढगाळ वातावरण राहील. तसेच, मोठ्या प्रमाणात वारे वाहतील असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. 7 मे नंतर पुन्हा कडक ऊन पडण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळी दिल्लीत ढगाळ आकाश आणि थंड वाऱ्यांपासून दिलासा मिळाला. दुपारी बारा वाजल्यानंतर उन्हाचा तडाखा अधिकच कडक होऊ लागला. कमाल तापमान सामान्यपेक्षा 40.5 अंश सेल्सिअस जास्त आणि किमान तापमान 25.8 अंश सेल्सिअसने सामान्य तापमानापेक्षा एक जास्त होते.
देशभरात वाढते तापमान आणि उष्णतेची लाट पाहता केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी रविवारी राज्यांच्या मुख्य सचिवांना एक आदेश जारी केला आहे. त्यामध्ये त्यांना प्रभावी व्यवस्था करण्यास सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की राज्यांसह राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) आणि हवामान विभाग (IMD) दररोज उष्णतेबद्दल निर्वानिचा इशारा देत असतात.