महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 16, 2023, 6:32 PM IST

ETV Bharat / bharat

Nizam of Hyderabad Passed Away : हैदराबादचे शेवटचे निजाम मीर बरकत अली खान यांचे निधन

हैदराबादचे आठवे निजाम मुकररम जाह यांचे काल रविवार (दि. 15 जानेवारी)रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी इस्तंबूल, तुर्की येथे निधन झाले आहे. दरम्यान, त्यांची जन्मभूमी हैदराबाद येथे अंत्यसंस्कार व्हाहेत अशी त्यांची इच्छा होती. त्या इच्छेनूसार त्यांच्या जन्मभूमीत अंत्यसंस्कार करण्याच्या निर्णय त्यांच्या मुलाने घेतला आहे. त्यानुसार त्यांचे पार्थिव उद्या हैदराबादला आणण्यात येणार आहे. त्यानंतर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Nizam of Hyderabad Passed Away
हैदराबादचे शेवटचे निजाम मीर बरकत अली खान यांचे निधन

हैदराबाद :हैदराबादचे आठवे निजाम नवाब मीर बरकेत अली खान वालाशन मुकररम जहा बहादूर यांचे काल रात्री उशिरा तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथे निधन झाले आहे. अशी माहिती मुकररम जाह यांच्या कार्यालयाने दिली आहे. दरम्यान, त्यांची जन्मभूमी हैदराबाद येथे अंत्यसंस्कार व्हाहेत अशी त्यांची इच्छा होती. त्या इच्छेनूसार त्यांच्या जन्मभूमीत अंत्यसंस्कार करण्याच्या निर्णय त्यांच्या कुटुंबाने घेतला आहे. पार्थिव हैदराबादला आल्यानंतर चौमहल्ला पॅलेसमध्ये येथे ठेवण्यात येणार आहे. त्यांतर असफ जही कुटुंबाच्या कबरीमध्ये त्यांचा दफनविधी होणार आहे.

निजामाची एकूण संपत्ती : निजाम घराण्याच्या श्रीमंतीची चर्चा प्रसिद्ध आहे. (1947)मध्ये जेव्हा देश स्वतंत्र झाला, तेव्हा निजाम हा पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानला जात होता. त्या काळी या संपूर्ण पृथ्वीवर हैदराबादचा शासक मीर उस्मान अली यांच्या बरोबरीचा पैसा, सोने-चांदी-हिरे-रत्ने कुणाकडे नव्हती. (1911)मध्ये उस्मान अली खान हैदराबादचा सातवा निजाम बनला. जेव्हा देश स्वतंत्र झाला आणि हैदराबाद भारतात विलीन झाले, तोपर्यंत फक्त उस्मान अली खान राज्य करत होते. निजामाची एकूण संपत्ती (17.47 लाख कोटी)म्हणजे (230 अब्ज डॉलर्स) इतकी होती.

निजामाने पेपरवेट म्हणून वापर केला : त्यावेळी निजामाची एकूण मालमत्ता अमेरिकेच्या एकूण जीडीपीच्या २ टक्के इतकी होती. निजामाकडे स्वतःचे चलन होते. त्याची स्वतःची टांकसाळी ते टांकसाळी नाणी, 100 दशलक्ष पौंड सोने, 400 दशलक्ष पौंड दागिने होते. निजामाच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत गोलकोंडा खाणी होता. जो त्यावेळी जगातील हिऱ्यांचा पुरवठा करणारा एकमेव स्त्रोत होता. निजामाकडे जेकब डायमंड होता, जो त्यावेळी जगातील सात सर्वात महागड्या हिऱ्यांमध्ये गणला जात होता. ज्याचा निजामाने पेपरवेट म्हणून वापर केला होता. त्याची किंमत 50 दशलक्ष पौंड इतकी असायची.

मोठ्या प्रमाणात :निजामाकडे अमाप संपत्ती होती. दुसऱ्या कोणाकडे असती तर तो सोन्याच्या पलंगावरच झोपला असता. अशी ऐश्वर्य निजामाच्या राजवाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरलेली होते. ज्याचे मूल्यमापन करणे सोपे नाही. जुन्या वर्तमानपत्रात गुंडाळलेल्या त्याच्या डेस्क ड्रॉवरमध्ये लिंबाच्या आकाराचा प्रसिद्ध 'जेकब' हिरा ठेवला होता. तो 280 कॅरेटचा होता. दूरवरून तो चमकत असायचा. मात्र, निजामाने ते पेपरवेट म्हणून वापरला होता.

शोकाकूल वातावरण : नवाब मीर बरकत अली खान यांच्या निधनाच्या बातमीने नूर महलमध्ये शोकाचे वातावरण आहे. माजी मंत्री नवाब काझिम अली खान उर्फ ​​नावेद मियाँ, रामपूरचे शेवटचे शासक नवाब रझा अली खान यांचे नातू, नवाब मीर बरकत अली खान यांचे निधन खेदजनक आहे. नवाब रझा अली खान यांचे आजोबा मीर उस्मान अली खान यांच्याशी खूप चांगले संबंध होते. हैदराबादचा निजाम जेव्हा रामपूरला येत होते तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्यात येत असे. त्यांच्या स्वागतासाठी रामपूरचा नवाब गेटही बांधण्यात आला होता. त्यानंतर खासबागमध्ये भव्य स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या स्थापनेत हैदराबादचा निजाम आणि रामपूरचा नवाब यांनी मिळून मोलाचे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. दोघांनी सर सय्यद अहमद खान यांना आर्थिक पाठबळ देऊन AMU चा पाया घातला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details